मिरज येथे दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण

 प्रवेशासाठी 31 जुलै पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे, दि. 27: शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज या संस्थेमार्फत प्रौढ दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. गरजू दिव्यांगानी योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 जुलै 2022 पूर्वी पोहचतील अशारितीने आपले अर्ज पाठवावेत, असे आवाहन संस्थेच्या अधीक्षकांनी केले आहे.

2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) साठी किमान इयत्ता 8 वी उत्तीर्ण, मोटार ॲन्ड आमेंचर रिवायडींग सबमर्सिबल पंप सिंगलफेज (इलेक्ट्रीक कोर्स) साठी किमान इयत्ता 9 वी उत्तीर्ण आवश्यक आहे. वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष असून प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा आहे. या संस्थेत फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश देण्यात येतो. प्रशिक्षण कालावधीत निवास, भोजन व प्रशिक्षणची व्यवस्था मोफत आहे. 

प्रवेश अर्ज व माहिती पत्रक अधीक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रेमळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, जि. सांगली, पिन-416410, दूरध्वनी क्रमांक 0233-2222908, भ्रमणध्वनी क्रमांक 9922577561 व 9975375557 येथे संपर्क साधून पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

प्रवेश अर्ज पूर्णपणे भरून फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल, असे संस्थेचे अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post