फायर ब्रिगेडच्या जवानांकडून बचावकार्य तातडीनं सुरू करण्यात आलं.
पुण्यातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यात एक दुमजली इमारतीची भिंत कोसळल्याचं वृत्ता हाती आलंय. ही घटना पुण्यातील नाना पेठेत ही घटना घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या जवानांकडून बचावकार्य तातडीनं सुरू करण्यात आलं. ही घटना रात्री घडली. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. तर दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.या घटनेमुळे पुण्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पावसाळ्यात अशा घटना घडतात. त्यामुळे वेळीच लक्ष दिलं गेलं पाहिजे. पुण्यातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस
पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस म्हणजेच गुरूवारपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात गेल्या 6 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं आहे. धरणातून 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे.