राज्यात कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील आठ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

 प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तवली आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : राज्यात कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील आठ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तवली आहे.सोमवारी विदर्भ, कोकणात धुवाधार, तर पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे व विजेच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस, तर 6 व 7 जुलैदरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची , हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.तसेच उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post