फिरोज मुल्ला (सर) यांच्या नेतृत्वाखाली सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी जन आंदोलन उभारण्यात आले .
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : (प्र.भा.क्र.११) बोपोडी येथे महावितरण विद्युत कंपनीने व राज्य शासनाने प्रति युनिट वाढीव लाईट बिल ग्राहकांना दिल्यामुळे याच्या निषेधार्थ प्रदेश प्रवक्ते फिरोज मुल्ला (सर) यांच्या नेतृत्वाखाली सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी जन आंदोलन उभारण्यात आले .
यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता मा.पी.पी.दांडगे साहेब(औंध विद्युत विभाग) यांना निवेदन देऊन तातडीने वाढीव लाईट बिल रद्द करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सौ.शकीला मुल्ला, पँथर आर्मीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत मुळे, जनशक्ती विकास संघाच्या प्रदेशाध्यक्षा सौ.सारीका खान,यांनी जाहीर पाठिंबा दिला तसेच आजाद समाज पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष रवी राखपसरे, महिला पुणे जिल्हा अध्यक्षा स्वातीताई गायकवाड, महिला पि.चि.शहर अध्यक्षा सौ.अनिता रिडलान,महिला पुणे शहर अध्यक्षा अर्चनाताई केदारी,संयोजक छ.शि.म.संघाचे अध्यक्ष संदीप शेंडगे, आदी मान्यवर नेते कार्यकर्ते स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते