पुणे महानगरपालिका “कर्मचारी भरतीबाबत जाहीर प्रकटन"



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी वेळोवेळी स्थानिक दैनिक वर्तमानपत्रात सविस्तर जाहिरात देऊन तसेच महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन पात्र उमेदवारांकडून https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येऊन कर्मचारी निवड समितीच्या अहवालानुसार पारदर्शकरित्या पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. याद्वारे सर्व नागरिकांना/ उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही मध्यस्थ / दलाल / परिचित/अपरिचित व्यक्तीशी पदभरतीबाबत आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरुपाची देवाण-घेवाण करू नये, अशा व्यक्तींकडून नागरिकांची/उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्या स्वरुपाची फसवणूक झाल्यास त्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी/उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पुणे महानगरपालिकेत कर्मचारी भरती करावयाची झाल्यास त्याबाबतची संपूर्ण माहितीसह सविस्तर जाहिरात अधिकृत दैनिक वर्तमानपत्रांत व पुणे महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर प्रसिद्ध करण्यात येते. त्यानुषंगाने पुणे महानगरपलिका अस्थापने वरील वर्ग-२ व वर्ग-३ मधील सरळ सेवेने पद भरती करिता जाहिरात क्र. १/३९८ दि.२०/०७/२०२२ अन्वये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसारनागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती उपलब्ध करून घ्यावी. अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त यांनी निवेदना द्वारे दिली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post