पिंपरी-चिंचवड येथील शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रकिया सुरु


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे, दि. 1:  शैक्षणिक वर्षात 2022 - 23 या साठी इयत्ता 10 वी नंतर महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या  विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड येथील 250 शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश देण्याची प्रकिया सुरु करण्यात आली आहे. 

विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार असून याठिकाणी विनामुल्य निवासव्यवस्था, आंथरूण-पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी इतर शैक्षणिक बाबींकरिता आर्थिक सहाय्य तसेच दरमहा निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार आहे. 

इच्छुक विद्यार्थ्यांना वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात येणार असून प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत. वसतिगृहातून प्रवेश अर्ज घेवून जाण्याचे आवाहन शासकीय मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या गृहप्रमुखानी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post