कुठे घेऊन चालले रे देश माझा...?

   राज्याचंच नव्हे देशाचं राजकारण बघता सत्ताधारी सौर्वभौम भारत कुठे घेऊन चाललेत? हा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 राज्यातील सत्तांतर बघता केंद्र सरकार ने सांम,दाम,दंड,भेद या कुटणीचा वापर करत उद्धव सरकार पाडले. याही पुढे जाऊन त्यांनी भ्रष्ट्राचारांचे १८ गुन्हे दाखल असलेल्या मा.एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले.आजपर्यंत ते ईडीच्या रडारवर होते,पण भाजपची साथ भेटल्या बरोबर ते पवित्र झाले आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान देखील झाले. एक ऑटो चालक,एक सामान्य कार्यकर्त्या कडे एवढी संपत्ती कुठून आली ? या प्रश्नाला देखील कायमचे पंगू करण्यात आले . ईडीच्या रडारवर असलेल्या खासदार भावना गवळी यांच्यासह शिंदे गटात गेलेले सर्व आमदार,मंत्री अचानक पवित्र आणि शुद्ध झाले...अपक्ष आमदार बच्चू कडू भ्रष्टचाराच्या आरोपातून मुक्त झाले.यावरून सर्व साधारण जनतेला देशात काय चाललंय याची कल्पना येत नसेल तरच नवल..! भाजपचे नेते बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा एजंडा राबवित असल्याची टिपणी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली . शपथविधी दरम्यान सभागृहात "जय श्रीराम" च्या घोषणा देखील देण्यात आल्या.म्हणजेच भारतीय असण्या पेक्षा,राष्ट्रीय असण्या पेक्षा 'कट्टर हिंदुत्व' जोपासणे राजकारणा साठी किती महत्वाचे असते,हेच सिद्ध करण्याची चढाओढ लागली आहे. सामान्य जनतेनी हिंदुत्वाच्या पलीकडे जाऊन रोजगार,मानवाधिकार,शिक्षण,विकास,आरोग्य यासारखे कोणतेच प्रश्न विचारू नयेत,याची रीतसर बांधणी देशात होतांना दिसते.      

                केंद्र सरकार ने ईडी,सीबीआय,आयटी सेल,विकाऊ मीडियाला हाताशी धरून अनेक राज्य गिळंकृत केले आहे.महाराष्ट्रातही तेच झालं.पैसा, ईडीपासून संरक्षण,पदाचे आमिष देऊन मा. उद्धव ठाकरेंना बॅक फुटवर आणण्याचे कुटील कारस्थान करण्यात ते यशस्वी झाले.आता ते उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच गिळंकृत करण्याच्या मोठया षढयंत्रात आहेत.उद्या निवडणूक आयोगाने 'शिवसेना' ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हा निर्वाळा दिल्यास नवल नको!कारण शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात १६ बंडखोर आमदारांच्या निलंबना बाबत याचिका दाखल केल्यावर ११ जुलै ही तारीख दिल्या जाते.आणि तिकडे राज्यपाल केश्योरी बंडखोरांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ देतात...याचाच अर्थ असा की सुप्रीम कोर्टात पडून असलेल्या शिवसेनेच्या याचिकेला ११ जुलै रोजी केराची टोपली दाखविली जाणार आहे,हे सिद्ध होते.एकंदरीत मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडखोर सेनेला निवडणूक आयोगाने असली शिवसेना ठरविल्यास उद्धव ठाकरेंकडे कुठलाच पर्याय उरणार नाही...ते नव्याने संघटन बांधणी करतील.आणि हे नकली लोक पद,पैसा, समित्याचे आमिष देऊन सेनेतील एकेक जिल्हाप्रमुख गळाला लावतील,असाच एकूण डाव आखल्या जात आहे.आणि याचे सूत्रधार प्रधान मंत्री मा.नरेंद्र मोदी,भाजपा चे अध्यक्ष जेपी नड्डा,गृहमंत्री अमित शहा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

     तिकडे हैद्राबाद चे नाव बदलून भाग्य नगर करण्याची भाजप नेत्यांडून आश्वासनं दिली जात आहे.हे कशाचे धोतक आहे ? अख्या भारतात भाजपच्या एकाही नेत्यावर अजून ईडीने कार्यवाही केली नाही.भाजपचे सारेच मंत्री , नेते एवढे शुद्ध आणि पवित्र आहेत..? सर्व प्रशासकीय यंत्रणांना हाताशी धरून एकाधिकार शाहीचा खेळला जाणारा खेळ येणाऱ्या हुकूमशाहीचे संकेत तर नाही...?? महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यावर भाजप विरोधी किंवा शिंदे गटा विरोधी भूमिका घेणाऱ्यांवर ईडी चा सूड उगारला गेला नाहीतर नवलच होईल!      

             भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगमबरां केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अख्या जगात भारताची बदनामी झाली.देशात दोन हत्या घडल्यात.मात्र आपले सर्वोच्च न्यायालय नुपूर शर्माला अटक करण्याचे आदेश देण्यापेक्षा टीव्हीवर येऊन माफी मागण्याचा सल्ला देते...

        एकंदरीत परिस्थिती बघता सर्वोभोम भारताची धर्मनिरपेक्ष लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे की काय ? याचा संशय येतो...खरंतर २०२४ हे भाजप साठी उद्दीष्ट साध्य करण्याचे महत्वपूर्ण वर्ष आहे.त्यानुरूप सर्व 'कुशल-मंगल' पद्धतीनं सुरू आहे.भारतीय लोकतत्रांच्या आभाळावर वारंवार पडल्या जाणारी भोकदाडे त्यावर कुणी ठिगळं जोडू नये यासाठीची केलेली कवायद,सर्वसामान्य मतदारांच्या उधळल्या जाण्याऱ्या चिंधळ्या,देशातील महत्वपूर्ण संस्थांचे बिनदिक्कत होणारे खाजगीकरण,मंदिर-मज्जीत,भोंगे,अग्निपथ,ऐतिहासिक शहरांचे नामकरण,श्रीकृष्ण मंदिर,मशिदीतील शिवलिंग, ताजमहल, कुतूबमिनार... हे एकाच वेळी सामान्यांच्या माणसपटलावर धंदेवाईक मीडिया कडून कोरले जाणारे हे विषय काय संकेत देतात...? देश कुठून कुठे चाललाय याचे प्रत्येक देशभक्त भारतीयांनी मंथन करणे गरजेचे झाले आहे.एवढे मात्र नक्की!


-नरेंद्र सोनारकर-२२

9112316645


Post a Comment

Previous Post Next Post