आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब, उद्धव साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये.

अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही,असा इशाराच आमदार संजय गायकवाड यांनी दिला


प्रेस मीडिया लाईव्ह :

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा माफिया म्हणून उल्लेख केला.यावरूनच आता शिंदे गटातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

किरीट सोमय्या यांनी मविआ सरकारवर बोलताना गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती, यावर बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच समाचार घेतला, किरीट सोमय्यांनी असं काही समजू नये की आता शिवसेना संपली, ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजपा - शिवसेना युती म्हणून काम करतोय, आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब, उद्धव साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये. यापुढे त्यांनी असे वक्तव्य करू नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशाराच आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. यामुळे मात्र भाजपा व शिंदे गटात ही मतभेद आता चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र आहे.

किरीट सोमय्या काय म्हणाले होते..?

सोमय्या यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर सोमय्या यांनी एक ट्वीट केले. ज्यात त्यांनी शिंदे यांचं अभिनंदन करत म्हटलं आहे की, ''मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माफिया मुख्यमंत्रीना हटवल्याबद्दल अभिनंदन केले.'' त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ''मी एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांचं कौतुक केलं. ज्या सरकारमधील काही लोकांच्या डोक्यात सत्तेचा माज गेला होता. ते सत्तेचा दुरुपयोग करत होते. ही एक प्रकारची माफियागिरी होती. मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. त्याचं कुटुंब हत्या करणाऱ्याला माफियाच म्हणणार ''

Post a Comment

Previous Post Next Post