महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात पुराने कहर केला आहे.

एकदंरीत परिस्थिती पाहता ठाण्यातील सर्व शाळा बारावीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.


प्रेस मीडिया लाईव्ह :

नवी दिल्ली – देशातील अनेक भागात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात पुराने कहर केला आहे. पुरामुळे आतापर्यंत 270 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.एकदंरीत परिस्थिती पाहता ठाण्यातील सर्व शाळा बारावीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.


महाराष्ट्रात पूर आणि पावसामुळे आतापर्यंत ८९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर गुजरातमध्ये ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरसद्दृश क्षेत्रात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे छिंदवाडा ते हरदापर्यंत पूर आला आहे. मध्य प्रदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील पालघरमध्ये वैतरणा नदीला पूर आला आहे. नदीकाठची गावे पाण्याखाली जाऊ लागली आहेत.

महाराष्ट्रात पूर आणि भूस्खलनाचा दुहेरी फटका

पालघर जिल्ह्यातून वाहणाऱ्या तानसा नदीनेही धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. तानसा नदीवर बांधलेला पूल पाण्यात बुडाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तानसी नदीवरील गोराड पूल पाण्याखाली गेल्याने पालघरमधील वाडा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पालघरमध्ये पूर आणि पाऊस यामुळे दुहेरी हाहाकार माजला आहे. पालघरजवळ अहमदाबाद-मुंबई महामार्गावर दरड कोसळल्याने रस्ता ठप्प झाला.

गुजरातमध्ये पुराचे तीव्र स्वरूप

गुजरातमधील नवसारी येथे पुराचे भीषण रूप पाहायला मिळाले.नद्यांना पूर आल्याने त्याचा परिणाम रहिवासी भागांवर होऊ लागला आहे. निवासी भाग पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. घरांचे खालचे मजले पाण्यात बुडाले आहेत. लोक घरात अडकले आहे, नवसारीतील पूरस्थिती पाहता शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post