प्रेस मीडिया लाईव्ह :
नवी दिल्ली : एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. मुर्मू यांनी विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे.या विजयासह मुर्मू देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या आहेत. मुर्मू हे झारखंडच्या राज्यपाल राहिल्या आहेत. मुर्मृ यांचा इथवरचा राजकीय प्रवास कसा राहिलाय, हे आपण जाणून घेऊयात.
कोण आहेत दौपदी मुर्मू ?
मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओरिसात झाला. मृमू यांचं पदवी शिक्षण भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून झालं. मुमृ यांनी पदवीनंतर शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी काही वर्ष ज्ञानदानाचं कार्य केलं.
सिंचन आणि उर्जा विभागात नोकरी
मुर्मृ यांनी सिंचन आणि विभागात 1979 ते 1983 दरम्यान ज्युनिअर असिस्टंट (कनिष्ठ सहाय्यक) म्हणून काम केलं. त्यानंतर मृमू यांनी 1994 ते 1997 हे 3 वर्ष रायरंगपूरमधील अरबिंदो इंटीगरल एज्युकेशन सेंटरमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणूनही काम केलं.
द्रौपदी मुर्मृ वैयक्तिक जीवनातील संघर्ष
मृमू यांच्या जीवनात एक काळ असा होता जेव्हा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे मुर्मृ मानसिकरित्या पूर्णपणे तुटल्या होच्या. मुर्मृ यांना 2009 मध्ये मोठा धक्का बसला. मुर्मृ यांच्या मोठ्या मुलाचा वयाच्या 25 वर्षी रस्ते अपघातात मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन करणं खूप कठीण झालं.
राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा त्यांना उमेदवारी देऊन भाजपने मोठा डाव खेळल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे होतं. भाजपने एका दगडात 2 पक्षी मारले.
भाजप आदिवासी व्होट बँकवर भर देत आहे. कारण येत्या काळात 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काही महिन्यांत निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पक्षाच्या नियोजनासाठी आदिवासी मतदार अत्यंत महत्त्वाचे आहेत.