श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन बी. एड, पेठ वडगांव येथे बी.एड द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे कार्येक्रम संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

 आज दिनांक 28/7/2022 रोजी श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन बी. एड, पेठ वडगांव येथे बी.एड द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  डॉ.प्रा. वानोळे बी.के होते. तसेच अध्यक्ष स्थान महाविद्यालयाच्या प्र प्राचार्या सौ.आर्.एल. निर्मळे यांनी भूषविले.या कार्यक्रमांमध्ये  कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड च्या "त्रैमासिकाचे" प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्रा. शिरतोडे व्ही.एल यांनी केले तसेच प्र पाहुण्याची ओळख प्रा सोरटे एस के यांनी करून दिली. कार्यक्रमामध्ये द्वितीय वर्ष व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.  प्र पाहुणे वानोळे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. प्राचार्या निर्मळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात समाधानी आयुष्य कसे जगावे? याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प शुभांगी पाटील यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका सुजाता कुंभार आणि प्रज्ञा पाटील यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post