मतदान राजकीय पक्षाच्या उमेदवारावर बहिष्कार टाकणे योग्य की अयोग्य विचार करा आणि...

 आणि मुलांच्या भवितव्यासाठी आता तरी..??? बाजीराव नाईक


प्रेस मीडिया लाईव्ह :

   लालूच आंधळी असते यात आंधळे होऊन लोक आपल हक्क व अधिकार विसरतात. अर्ध्या सोडून पूरणाचया माग लागला तो पुरता बुडला राजकारणी लोकांवर विश्वास ठेवणे धोक्याचे असते.

आपल्या सर्वांच्या परिचयाचा हा आणि आपल्या वाचण्यात कायम येणारा शब्द म्हणजे बहिष्कार  एकादी गोष्ट घटना आपल्या मनाविरुद्ध झाली असेल किंवा होतं असेल तर आपणं त्या घटनेचा परिस्थितीचा बहिष्कार करतो . त्याच्या जोडीचा अजून एक शब्द म्हणजे वाळीत टाकणे . पूर्वी गावच्या गाव  व त्या गावातील कुटुंब विशिष्ट कारणासाठी वाळीत किंवा बहिष्कृत केली जात असत. लोक त्या गावाकडे त्या वाळीत टाकलेल्या कुटुंबाकडे सुखात दुःखात कोणी जात नसत. म्हणजे ही त्या गावाला . कुटुंबाला. व्यक्तिला एक प्रकारचीं शिक्षाच दिल्याप्रमाणे आहे . 

बहिष्कार म्हणजे एखाद्या 

 व्यक्तीचा, संस्थेचा किंवा देशाचा निषेध व्यक्त करण्यासाठी , सामान्यतः नैतिक, सामाजिक , राजकीय किंवा पर्यावरणीय कारणांसाठी वापरण्यापासून स्वैच्छिक आणि हेतुपुरस्सर वर्ज्य करण्याची कृती. बहिष्काराचा उद्देश म्हणजे काही आर्थिक नुकसान किंवा नैतिक आक्रोश करून आक्षेपार्ह वर्तन जबरदस्तीने बदलण्याचा प्रयत्न. जेव्हा राष्ट्रीय सरकारद्वारे समान प्रथा कायदेशीर केली जाते, तेव्हा ती बंदी म्हणून ओळखली जाते .

          आज आपल्यातली निवडणूक प्रक्रिया व त्यामध्ये प्रतिनिधित्व करणारे उमेदवार  यांना सुध्दा धडा शिकविण्यासाठी आपणं आज मतदान बहिष्कार करण्याची गरज आहे. कारणं निवडणुकीत मतदान मिळविण्यासाठी . जातीयवाद. प्रांतवाद. गुंडगिरी. प्रचार विविध माधयम. आश्वासनांचा पाऊस. पैशांचा अपव्यय. मतदार यांना धमकी. उमेदवार उचलून नेणे. अशा विविध माध्यमातून निवडणूक लढवली जाते हे आपणास सर्वांना माहीत आहे  उमेदवार यांना माहीत आहे आपलं काम कोण बघत नाही. मतदार हे लाचार असतांत गेल्यावर्षी एक हजार आणि ह्या वर्ष दोन हजार दिलं कि लोक आपणास डोळझाकून मतदान करणार  विकास होण्यापेक्षा पैसा महत्वाची भुमिका निवडणुकीत बजावितो अशी भ्रामक कल्पना या उमेदवार यांच्या डोक्यात आहे. आज सर्वत्र आपणं एक प्रथा बघतो ती म्हणजे वडोलोपारजित म्हणजे आज पर्यंत वडलाने आपणांस गुलाम केल आणि समाजातील सर्वजण मेल्यासारखे त्याचाच मुलगा आपल्याला गुलाम करण्यासाठी राजकारणात येतो. आणि आपणं त्यालाच निवडणून देतो आणि पाच वर्षांत त्याचा चेहरा सुद्धा आपणास बघायला मिळतं नाही . 

         आपल्या सरपंच उपसरपंच नगरसेवक . यांची काय गरज आहे आपली सर्वसामान्य गोरगरीब लोकांची काय शासकीय काम असतांत . रेशन. महसूल. विविध शहरी व ग्रामीण विकासाच्या योजना . घरपट्टी. लाईट बिल. पाणी बिल. रस्ते गटारे. स्मशानभूमी. समाजमंदिर. प्राथमिक शिक्षण. गावांचा शहरांचा सर्वांगिण विकास योजना. आपले लघुउद्योग. आपला दैनंदिन व्यवसाय यासाठी सरपंच उपसरपंच नगरसेवक यांची तुम्हाला काहीच गरज नसते त्यासाठी *प्रशासन व प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आपल्याच सेवेसाठी शासनाने नेमले आहेत .  त्यातून जर एकादा अधिकारी व कर्मचारी आपल्या कामात टाळाटाळ करत असेल तर त्याच्या कानाखाली वाजवा कारणं त्याचा पगार आपल्या पैशातून दिला जातो.* 

        निवडणूक आली की आपणं सुध्दा कोणता उमेदवार किती पैसे वाटप करतो. कुणाचे मटनाचे जेवण आणि दारू मिळेल. यासाठी आपण मतदान करायला सुध्दा जात माझं पाकीट अजून आल नाही ही आपली मानसिकता आपल्याला गुलाम करायला पुरेसी आहे असं मला वाटतं. पाच वर्षांतून एक वेळ आपल्या मतदार बांधवांच्या पाय पडणारे तुमची काय अडचण आहे हे विचारणारे.  निवडणूक झाल्यावर निवडणून आल्यावर आपल्याला त्यांच्या दारात आरोपी असल्यासारखे उभं करतात. जादा काही बोललं तर फुकट मतदान केलं नाही पैसा दिला तेव्हा तुम्ही मतदान केलं असं एकाव लागतं यांच्यापेक्षा आणि कमीपणा कशात असतो. 

            *आपणं सर्वांनी विचार करून मतदान यांवर राजकीय संधी साधुन उमेदवारावर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे.* नाहीतर प्रत्येक समाजातील आपला हक्काचा उमेदवार उभा करा कोणीही उमेदवार दिला आहे मतदान करावं लागतं म्हणून मतदान करु नका . कारणं या कामापुरतया उमेदवार यांना निवडून दिल्यामुळे यांना रस्ता गटर. लाईट व्यवस्था. पाणीपुरवठा. साफसफाई टेंडर. शाॅपिंग सेंटर लिलाव. अशा विविध ठिकाणी पैसा खाण्यास आपणच कुरण मोकळं करुन देत असतो . विविध ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यामधील टे़डर हे या़चयाच ठेकेदार इंजिनिअर कंत्राटदार यांनाच दिलें जाते आपल्या गावातील शहरातील मजूर लोकांची सोसायटी असेल तर त्याला एकही ठेका दिला जात नाही. ठेकेदार कंत्राटदार इंजिनिअर याच राजकारणी लोकांचे बगलबच्चे असतांत. कोठेही नियमानुसार काम होत नाही सर्व काम बोगस करुन शासनाचा निधी गायब केला जातो. सर्वसामान्य गोरगरीब लोकांना हे दिसतंय पण कोण बोलणार बोलाव तर या ठेकेदार कंत्राटदार इंजिनिअर यांच्याकडे पैसा राजकीय वरदहस्त गुंडगिरी यामुळे गरिबांना मुकयाचा मार खावा लागत आहे. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांच्या मिटींगा चार भिंतींच्या आत घेतल्या जातात त्यात सर्वसामान्य लोकांना बोलवलं जातं नाही. काय ठरलं काय नवीन आलं हे आपणास कोणाच्यातरी तोंडून ऐकावं लागतं यासारखं वाईट काय आहे. *विरोधात बोलणारा मतदार यांना साक्षर प्रबोधन संबोधन करणारा माणूस चालतं नाही. त्यांच्या घरांवर जागेवर त्यांच्या जाणे-येणे साठी असणारा रस्ता यावर राजकीय आरक्षण टाकले जाते.* एखाद्या व्यक्तिने आपल्या प्रभागासाठी अंगणवाडी किंवा अन्य जनहित योजना मागितली तर त्याची जागा हस्तांतरित करण्याचा डाव आखला जातो. 

          *ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका निवडणूक सुरू झाली की संपर्क दौरा. प्रचार सभा  राजकारणी यांच मतदार यांचेकडे येणे जाणे सुरू होतं.* *सत्ताधारी यांनी काय केलं आम्ही सत्तेत नसताना काय केलं किती विकास केला कशाचा विकास केला याचा पाढा वाचला जातो आणि आपणं या बोलण्यावर भुलून जातो आणि फसतो आत्ता मतदार जागृक नाही असा समज मोडून काढण्याची गरज आहे.* 

               निवडणुकीच्या माध्यमातून आपणं आपला हक्काचा माणूस म्हणजे लोकांना हक्काच्या योजना लोकांच्या पर्यंत पोहचवून लोकांना मिळविण्यासाठी देणारा माणूस निवडतो. आपल्या शिक्षित मुलांना नोकरी लागावी यासाठी विविध उद्योग धंदे तयार करणारा माणूस उमेदवार असावा. पण आज उलटं झाले आहे. राजकारणी लोकांनी सार्वजनिक प्रयोजन नावाखाली हजारों एककर जमीन लाटली त्यावर सुतगीरणी साखर कारखाने. अॅकडमी. टोलेजंग दवाखाने. महागडी शिक्षण व्यवस्था. बॅंका पतसंस्था संस्था. या माध्यमातून जनकल्याण पेक्षाही त्यांनीच कोटी लाखोंची संपत्ती गोळा केली. नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांना पेन्शन आहे कां राजकारण म्हणजे नोकरी नाही मग यांच्यासाठी पैसा कशासाठी खर्च करायचा यांना पोलीस बंदोबस्त. मोबाईल खर्च आपल्याच पैशातून दिला जातो कशासाठी आपणांस माहीत आहे कां. ६० वर्षांनी शासकीय निमशासकीय नोकरीत असणारे रिटायर्ड होतात. ६० वर्षापूढे आपल्या सर्व शासकीय निमशासकीय पेन्शन सोडून सर्व योजना बंद होतात मग *राजकारणी यांना रिटायर्ड मेंट आहे कां नाही तुम्हाला काय माहित आहे कां ?? 

निटच विचार करा झोपेचं सोंग घेऊन नका, आणि मतदान करा पन जागृत राहून मतदान करा,

 

मा बाजीराव सदाशिव नाईक

      संस्थापक/अध्यक्ष

बहुजन परिवर्तन पार्टी प्र. महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती.

Post a Comment

Previous Post Next Post