मुंबई सह ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस पडत असल्याचं चित्र दिसत आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूर आल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच शेतीला देखील मोठा फटका बसला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात गंबीर स्थिती आहे. तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली या भागात देखील पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याच बरोबर मुंबई सह ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस पडत असल्याचं चित्र दिसत आहे.आंबोली घाटात झाड कोसळलं
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात झाड कोसळल्याची घटना घडली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या तिथे एकेरी वाहतूक सुरु आहे. दरम्या, झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सरु आहेत.
अमरावती जिल्ह्यातही जोरदार पाऊस
अमरावती जिल्ह्याला वरदान असलेल्या अप्पर वर्धा धरणाची 13 गेट उघडण्यात आली आहेत. तेरापैकी 9 गेट 70 सेंटिमीटरने तर चार गेट 60 सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत. त्यामधून 1 हजार 392 दश लक्ष घन मीटर क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.