प्रेस मीडिया लाईव्ह ,:
करोली (म), सांगली या खेडेगावात जन्मलेले श्री.चंद्रकांत गोविंद बनसोडे यांच्या घरची परिस्थिती खूप गरीबीची. पण लहानपणापासूनच देशसेवेची आवड. आर्मी, नेव्ही यासारख्या संरक्षण खात्यात काम करण्याची इच्छा. लहानपणी एक मोठा दगड पायावर पडल्याने दुखापत झालेली आता मिलिटरी मध्ये जाता येणार नाही, हे त्यांना दुःख झाले. पण रोजची मेहनत करीत राहिले. बससाठी पैसे नसल्याने रोजचा सायकलवर प्रवास ठरलेला. कालांतराने सैन्य दलात भरती झाले.
शिपाई ते कॅप्टन अशी २८ वर्षे सेवा केल्यानंतर व सेवानिवृत्त झाल्यानंतर पुण्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे 'सैन्य प्रशिक्षक' म्हणून गेली १४ वर्षे सेवा केली आहे व आता ते सेवानिवृत्ती झाले आहेत. त्यांच्या या कालावधीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थिनी आर्मी मध्ये अधिकारी पदावर काम करीत आहे, तर काही विद्यार्थीनींना रायफल शूटिंग चे आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. कॅप्टन बनसोडे हे दहावी उत्तीर्ण आहेत. "आर्मीच्या शिस्तप्रिय प्रशिक्षणाचा स्वतःच्या आयुष्यात फार मोठा उपयोग झाला. मी हे सर्व माझी पत्नी शोभा चंद्रकांत बनसोडे यांनी केलेल्या मदतीने करू शकलो",असे श्री बनसोडे म्हणाले. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या प्राचार्य डॉ. सुलभा विधाते व उप प्राचार्य श्री अनंत कुलकर्णी यांनी श्री. बनसोडे यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.