पतसंस्थेच्या नियामक मंडळ संदर्भात जिल्हास्तरीय चर्चा सत्रामध्ये नियामक मंडळास कडाडून विरोध


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ तालुका प्रतिनिधी : रमेशकुमार मिठारे

९८२२३३२४४६ 

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये पतसंस्थेच्या कामकाजासंदर्भात विविध मार्गदर्शक व माहीती संदर्भात कलमे असताना कलम १४४ मध्ये फक्त पतसंस्थांसाठीचे प्रकरण  १ अ समाविष्ट करून पतसंस्थाकडून अशंदान वसुली, नाममात्र सभासद व्यवहारांवर बंदी व मोठ्या प्रमाणात आकारलेल्या अर्थिक दंडाची तरतूद व शास्ती या संदर्भात कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन व जिल्हातील सर्व पतसंस्था प्रतिनिधी यांचे संयुक्त विदयमाने जिल्हास्तरीय चर्चासत्र शाहू स्मारक कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये पतसंस्था नियामक मंडळास कडाडून विरोध करण्यात आला.


यावेळी कोल्हापूर शहर पतसंस्था प्रतिनिधी पाटील यांनी सांगीतले की राज्यातील १७ हजार पतसंस्थांवर नियामक मंडळातील पतसंस्थांचे फक्त ४ प्रतिनिधी हे पतसंस्थांच्या संपुर्ण कामकाजावर कश्याप्रकारे नियमन कसे करू शकतात? सध्या नियमन तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत सहकार खात्यामार्फत आहेच शिवाय सहकार खात्याचे आयुक्त हेच या नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे हे दुहेरी नियमन रद्द झाले पहिजे .आजरा तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष  अल्वर्ट डिसोझा यांनी आम्ही सभासदांच्या विश्वासर्हतेवर पतसंस्था उत्तम प्रकारे चालवित आहोत. मात्र या नियामक मंडळाच्या जाचक अटी पहाता पतसंस्था चालविणे अवघड आहे म्हणून हे नियामक मंडळ रद्द झाले पाहिजे या करिता तालुकातील सर्व पतसंस्थांनी याचे गांभीर्य आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधीना सांगून सदर नियामक मंडळ रदद करणे संदर्भात निवेदन द्यावे.चंदगड तालुका पतसंस्था प्रतिनिधी  पी वी पाटील व  एम एन पाटील यांनी सांगितले की ३ वर्षाची शिक्षा कोणताही अपराध व अफहार न करता फक्त अज्ञानाने सुध्दा होऊ शकते या बाबत खंत व्यक्त करून अशा जाचक अटी नव्हे तर संपुर्ण नियामक मंडळच रद्द झाले पाहिजे असे सांगीतले तर सांगाती पतसंस्था चेअरमन नितीन पाटील यांनी पतसंस्था या खुप चांगल्या पध्दतीने विश्वासर्हतेवर काम करत असताना समाजामध्ये चुकीच्या पध्दतीने पतसंस्थांच्या संदर्भात संभर्म निर्माण करून नाममात्र सभासद व्यवहारावर निर्बंध आणुन सहकाराच्या खुले व ऐच्छिक सभासदत्वला हरताळ फासला जात आहे. ९७ व्या घटना दुरुस्ती नुसार स्वायत्ता देण्याऐवजी बंधनेच अधिकच लादली जात आहेत.कागल तालुका पतसंस्था प्रतिनिधी समाट सनगर यानी आपण वेळोवेळी निवेदन देतो मात्र दुर्देवाने त्याची दखल घेतली जात नाही यासाठी दोनस्तरावरून लढाई आवश्यक आहे.

 यापुढे आंदोलन व न्यायालयीन लढाई करूया . ज्योतिलिंग पतसंस्था कसबा तारळे चे चेअरमन शिवाजी पाटील यांनी समाजामध्ये पतसंस्थांना नियमन नको आहे म्हणून नियामक मंडळास विरोध होत असल्याचा चुकीचा संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र नियामक मंडळास ठेवीवरील दयावे लागणारे अशंदान व त्याचा वापर या संदर्भात स्पष्टता नाही तरी याबाबत कायदा व्हावा.बँकींगच्या धर्तीवर ठेव संरक्षण व पतहमी महामंडळाची निर्मीती व्हावी.गडहिंग्लज व्यापारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन राजशेखर यरटी यांनी नियामक मंडळ रद्द करणे संदर्भात कोणत्याही लढाईस अर्थिक पाठबळ देण्याबाबत आपण कमी पडणार नसल्याचे सांगून सर्व पतसंस्थांनी यावावत जिल्हा फेडरेशने पुढाकार घेणेचे आवाहन केले.यानंतर सर्व पतसंस्था प्रतिनिधीनी सर्वानुमते महाराष्ट्र राज्य फेडरेशन व जिल्हा फेडरेशनने सांगितले शिवाय कुणीही अंशदान भरू नये किंवा त्याची तरतूद करू नये असे आवाहन केले. 

प्रत्येक पतसंस्थांनी नियामक मंडळ रदद व अशंदान भरणार नसल्याचे संस्था ठराव जिल्हा फेडरेशनकडे तातडीने जमा करावेत तसेच अर्थिक वर्ष संपल्यानंतर आलेले लेखापरिक्षण निर्देश व अर्थिक वर्षाच्या अगदी शेवटी आलेले ९ महिनेचे एन पी ए कालावधी या दोन परिपत्रकांना मुदतवाढ मिळणे साठीची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील  शेकडो पतसंस्था चेअरमन पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post