शेतीच्या कामांनाही वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे
प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ. प्रमोदीनी माने : (कोल्हापुर . जी.प्रतिनिधी )
कोल्हापूर शहरा सह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामांनाही वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 16 बंधाऱ्यांवर पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. जिल्ह्यातील अजूनही 15 बंधारे पाण्याखाली असले, तरी पाणी वेगाने ओसरत असल्याने ते सुद्धा लवकरच मोकळे होतील, अशी चिन्हे आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये निम्म्य्याहून अधिक पाणीसाठा झाला असला, तरी ती पूर्णत: भरलेली नाही. पाटबंधारे विभागाकडून धरणातून पाण्याचे विसर्ग करण्याचे नियोजन सुयोग्य झाल्याने यंदा अजूनपर्यंत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नाही. पंचगंगा नदी पुन्हा पात्राकडे गेल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट, तर धोका पातळी 43 फुट आहे. मात्र, जुलैच्या पावसाने आजअखेर,पंचगंगेची पातळी इशारा पातळीवर पोहोचलेली नाही. काल दिवसभरात पंचगंगेची पातळी 4 फुटांनी कमी झाली होती.