प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटदार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे) या अधिसूचनेची मुदत 8 मार्च रोजी संपली आहे. या अधिसूचनेस महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटदार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे) नियम २०२२ असा बदल करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कळविले आहे.
हा मसूदा महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब दि. 5 जुलै 2022 मध्ये प्रसिध्द करण्यात आला आहे. अधिसूचना बाधा पोहचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली असून अधिसुचनेमध्ये नमुद मसूदा 4 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येणार आहे.
या अधिसुचनेच्या मसुद्या संबंधात कोणत्याही व्यक्तीच्या प्राप्त होणा-या हरकती किंवा सूचना अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय मुंबई 400 032 यांच्याकडे दि.3 ऑगस्टपर्यंत सादर करावे, असे आवाहन तहसिलदार (महसुल) सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.