प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ. प्रमोदिनी माने :
कोडोली : निसर्गाचे वरदान लाभलेल्या मसाई पठारवरती मद्यप्राशन करून धिंगाणा घालत पर्यटकांना त्रास होईल असे वर्तन करणाऱ्या काही हुलडबाजी तरुणांवरती कोडोली पोलिसांनी रविवारी कडक कारवाई केली.
हुलडबाजी भादरांविरोध कोडोली पोलिसांनी मोहीम सुरू केली असल्याने मद्यपी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. मसाई पठारावरील मसाई देवी ला जाणाऱ्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे त्याचबरोबर पठारावरती पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी कुटुंबासह पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र येथे काही विकृत मानसिकतेचे हुलडबाज पर्यटकांच्या आनंदावर विरजण टाकत आहेत मद्यपान करून अश्लील नृत्य करणे, मोठमोठ्याने ओरडणे, अश्लील हावभाव करणे, महिलांकडे पाहून अश्लील वर्तन करणे अशा हुल्लडबाज तरुणांची दहशत निर्माण झाल्याने सहकुटुंब व मुलींना असुरक्षित वाटू लागल्याने रविवारी कोडोली पोलिसांनी गस्त घालून मद्य प्राशन करून हुलडबाजी करणाऱ्या तरुणांना पकडून त्यांना भर पावसात अर्धा तास उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. तर काही अतिहुलडबाज तरुणांना पोलिसी प्रसाद दिला.
पठारावरती अचानक पोलिसांनी अशी कारवाई सुरू केल्याने मद्यपी हुल्लडबाजीची पळताभुई थोडी झाली. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या व हुल्लडबाजी करून सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना त्रास देताना आढळून येणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कोडोली पोलीस ठाण्याचे सपने शीतलकुमार डोईझर यांनी सांगितले. फोटो ओळ कोडोली: मसाई पठारवरती हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवरती कारवाई करतांना कोडोली पोलीस सदर बातमीचा फोटो मेल वरुन पाठवला आहे