काय सांगताय राव... खिद्रापूर ग्रा.पं.ची मालमत्ता कागदोपत्री गायब ?

अशी कोणतीच कागदपत्रके - लेखा जोखा उपलब्ध नसल्याची लेखी माहिती ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांनी दिली 

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीत ऐलान फाऊंडेशनच्या घरकुल बांधकामाबाबतचे ठराव, लाभार्थीने सादर केलेले प्रतिज्ञापत्र, इतिवृत्त अशी कोणतीच कागदपत्रके - लेखा जोखा उपलब्ध नसल्याची लेखी माहिती ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांनी दिली आहे. यामुळे खिद्रापुरात जोरदार खळबळ उडाली असून खिद्रापूर ग्रामस्थांच्या पायाखालची जमीन सरकली आहे 

दरम्यान, बांधकामाबाबतचे ठराव, लाभार्थीनी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे आणि रेकॉर्ड ही ग्रामपंचायतीची कागदोपत्री शासकीय मालमत्ता गायब कोणी केली ?  याची खातेनिहाय चौकशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. ऐलान फाऊंडेशनच्या घरकुल बांधकामाचा करारपत्र करण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन मागणीचा ठराव करण्यात आला होता. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे बांधकामाच्या रेखांकनाला मंजुरी मिळावी, असा पत्रव्यवहार करण्यात आला होता. 

रेखांकनाला मिळालेली मंजुरी पत्रे तर लाभार्थींनी ग्रामपंचायतीकडे सादर केलेली प्रतिज्ञापत्रे अशी कोणतीच कागदपत्रे उपलब्ध नसल्याची माहिती ग्रामसेवक मुल्ला यांनी लेखी स्वरूपात ग्रामस्थांना दिली आहे.

काही ग्रामस्थांनी या ठरावाची नक्कल प्राप्त केली आहे. तीच नक्कल आणि कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे ग्रामसेवक मुल्ला यांनी सांगितल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायतची कागदोपत्री मालमत्ता गेली कुठे ? ही कोणी नष्ट केली का? असा सवाल उपस्थित करत आहेत. या कागदोपत्रीमा लमत्तेची खातेनिहाय चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post