ऐलान फाऊंडेशन प्रतिनिधीचा लाभार्थीकडे खुलासा
या बाबत फाऊंडेशन प्रतिनिधीलाच ताब्यात घेऊन कसून चौकशी करावी, अशी जोरदार मागणीही होत आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
ऐलान फाऊंडेशनच्या घरकूल बांधकामाबाबतचे प्रतिज्ञापत्र, ठरावासह सर्व कागदपत्रे २०२१ च्या महापुरात भिजून खराब झाली, असा स्पष्ट खुलासा ऐलान फाऊंडेशनच्या प्रतिनिधीने लाभार्थीकडे केला. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. भ्रष्टाचाराचे पुरावे महापुराच्या मदतीने त्यांनीच नष्ट केले असावेत असा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. या बाबत फाऊंडेशन प्रतिनिधीलाच ताब्यात घेऊन कसून चौकशी करावी, अशी जोरदार मागणीही होत आहे.
खिद्रापूर ग्रामपंचायतीत ऐलान फाऊंडेशनतर्फे करण्यात येणाऱ्या बांधकामाबाबतचा ठराव, रेखांकन मंजुरीचे पत्र गणेश नामदेव पाखरे यांनी माहिती अधिकाराखाली प्राप्त केले आहे. पाखरे यांनी घरकूलचा लाभ मागणी केला असता लाभ न मिळाल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता त्यावेळी सरपंच व ग्रामसेवकांनी ऐलान फाऊंडेशनच्या बांधकामाशी ग्रामपंचायतीशी अर्थाअर्थी कोणताच संबंध नसल्याचे पत्र दिले होते.पंचायत समितीचे गट विस्तार अधिकारी रवी कांबळे यांनीआंदोलनस्थळी भेट घेऊन पाखरे यांनी प्राप्त केलेली सर्व ठराव व कागदपत्रे घेत बांधकामाबाबतचे ठराव मंजुरी पत्रे पंचायत समितीत सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांनी कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगितले. एकीकडे ग्रामसेवक व सरपंच फाऊंडेशनच्या बांधकामाशी कोणताच संबंध नसल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे फाऊंडेशनच्या प्रतिनिधीने सर्व कागदपत्रके महापुरात बुडून खराब झाल्याचा खुलासा केला आहे