ऐलान फाऊंडेशनने जिल्हा परिषदेशी केलेल्या करारपत्रात घरपडझडीचे ९५ हजार १०० रुपये फाऊंडेशनकडे जमा करण्याबाबत कुठेही उल्लेख केलेला नाही.
प्रतिज्ञापत्र करणारा लाभार्थी समोर नसताना प्रतिज्ञापत्रावर अधिकारी सही करतातच कसे..?
प्रेस मीडिया लाईव्ह :
खिद्रापूर येथील ऐलान फाऊंडेशनच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या करारपत्राची लाभार्थीने झेरॉक्स मागितल्यानंतर ती न देता उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू आहे . कराराची झेरॉक्स न देण्यामागचे मोठे गुपित काय..? झेरॉक्स के पीछे क्या है..? असा प्रश्न लाभार्थ्यांतून उपस्थित होत आहे.
कुरूंदवाड येथे लाभार्थीच्या नावे १०० रुपयांचा स्टॅम्प घेऊन करार टायपिंग करून प्रतिज्ञापत्र करण्यासाठी तहसील कार्यालयात १ हजार रुपये खर्च येतो, असे सांगून गरीब गरजू लाभार्थ्यांकडून फाऊंडेशनच्या प्रतिनिधीने घेतल्याचे ते बोलत आहेत. ऐलान फाऊंडेशनने जिल्हा परिषदेशी केलेल्या करारपत्रात घरपडझडीचे ९५ हजार १०० रुपये फाऊंडेशनकडे जमा करण्याबाबत कुठेही उल्लेख केलेला नाही. बांधकामाच्या आराखड्याच्या करारपत्रात लाभार्थी स्वखुशीने ९५ हजार १०० रुपये देत असल्याचा उल्लेख फाऊंडेशनच्या प्रतिनिधीने फस्त केल्याचे लाभार्थी बोलत आहेत.
बांधकाम सुरू असताना लाभार्थी नसताना प्रतिज्ञापत्रावर अधिकाऱ्यांची सही कशी..? प्रतिज्ञापत्र करणारा लाभार्थी समोर नसताना प्रतिज्ञापत्रावर अधिकारी सही करतातच कसे..? संबंधित अधिकाऱ्यांचे फाऊंडेशन प्रतिनिधींशी काय लागेबांधे आहेत का.?. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांची तहसीलदारांनी सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वापरण्यात येणाऱ्या सळीसह बांधकामाच्या गुणवत्तेबाबत लाभार्थ्यांना शंका आल्याने त्यांनी करारपत्रात नेमका काय आराखडा नमूद केला आहे, हे पाहण्यासाठी लाभार्थ्यांनी फाऊंडेशनच्या प्रतिनिधिकडे करारपत्र मागणी केलीअसता त्यांनी करारपत्र फाऊंडेशनकडे जमा केले आहे. तुम्ही करारपत्र मागितले तर तुमचे काम बंद पाडतो, अशी धमकी दिल्याचे लाभार्थी सांगत आहेत.