प्रेस मीडिया लाईव्ह :
खिद्रापूर : येथील घरकुल बांधकामाचा करार हा जिल्हा परिषदेसोबत झाला असताना प्रशासनास विश्वासात न घेता कराराचा भंग करीत परस्पर व्यवहार करणाऱ्या त्या लोकांनी खिद्रापूरमधील परिस्थिती नियंत्रणात न आणल्यास प्रसिद्धी माध्यमासमोर त्यांची नावे जाहीर करणार. तसेच कराराचा भंग केले प्रकरणी एलान फौंडेशनला नोटीस काढण्या संदर्भात प्रशासनाला अहवाल सादर करणार असल्याचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी सांगितले.