जयसिंगपूर : नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे

तालुका आढावा बैठकीनंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आवाहन

प्रेस मीडिया लाईव्ह :

जयसिंगपूर : मान्सून महाराष्ट्रामध्ये सक्रिय झाला आहे, जवळपास सर्व जिल्ह्यात आणि धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे, पावसाचा वाढता जोर पाहता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे, मंगळवारी सकाळी मुंबईहून मतदारसंघात दाखल होताच आमदार यड्रावकर यांनी दुपारी जिल्हा आपत्कालीन बैठकीस उपस्थित राहून एकूण परिस्थितीचा आढावा घेतला, सरासरी पडत असलेला पाऊस आणि नद्यांच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ याबाबत माहिती घेताना पूर् परिस्थिती निर्माण झालीच तर करावयाच्या उपाय योजना याबाबत ही अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी दिली एनडीआरएफ ची पहिली तुकडी मंगळवारी सायंकाळपर्यंत शिरोळ तालुक्यात

दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले, कोल्हापूर येथील बैठक संपताच  शिरोळ तालुक्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मंगळवारी सायंकाळी शिरोळ तालुक्यातील प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, महापुराबाबत संवेदनशील असलेल्या गावातील ग्रामसेवक, तलाठी वीज मंडळाचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आपल्या नेमणुकीची जागा सोडू नये असे आदेश सर्व संबंधितांना द्यावेत अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या, बैठकी मधूनच त्यांनी कर्नाटक पाटबंधारे विभागाचे अभियंता श्री पुजारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत अलमट्टी धरणातील पाणीसाठा व पाण्याची होणारी आवक याबाबत माहिती घेतली, बैठकीस उपस्थित असलेल्या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या परवानगीने पाण्याची गरज भासणार नाही अशा ठिकाणचे नदी काठावरील ट्रान्सफॉर्मर पुर येण्यापूर्वी काढून घेता येतात का? याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या, सर्व धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाने दक्ष रहावे असेही सांगितले, तसेच शिरोळ तालुक्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला व अधिकाऱ्यांना उपाययोजनांबाबत आदेश दिले, एकूण परिस्थिती पाहता शिरोळ तालुक्यातील नदी काठावरील गावातील जनतेने सतर्क रहावे संबंधित गावातील नागरिकांनी ग्रामसेवक व तलाठी यांच्याशी संपर्क ठेवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले, बैठकीस तहसीलदार अपर्णा मोरे -धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, पाटबंधारे विभागाचे प्रशांत कोळी,  वीज मंडळाचे अधिकारी श्री गोंदील सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. बागवान आदी उपस्थित होते.

_______________________________________________

राज्यातील राजकीय घडामोडी घडत असताना पंधरा दिवस या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर मंगळवारी सकाळी मतदारसंघात परतले,

नागरिकांच्या भेटीनंतर प्रशासनाच्या जिल्हा आपत्कालीन बैठकीस उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी तालुका स्तरावरील शिरोळ तालुक्यातील प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धरण क्षेत्रात पडणारा पाऊस व तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ याबाबत सर्व संबंधितांशी चर्चा करत आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले

आमदार राजेंद्र पाटील यांच्या प्रयत्नातून मंगळवारी रात्रीपर्यंत एनडीआरएफ चे पथक शिरोळ तालुक्यात दाखल होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post