मराठा हायकर्सतर्फे पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहिम


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथील मराठा हायकर्स यांच्यावतीने 16 व 17 जुलै रोजी राजस्तरीय शिवयोद्धा पावनभूमी म्हणून पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहिम आयोजित केली आहे. साधारण या मोहिमेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 400 च्या आसपास मोहिमवीर सामील होतील असा विश्‍वास आहे.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी मराठा हायकर्स ऑफीस गांधी पुतळा, मंगळवार पेठ, चौंडेश्‍वरी मंदीर यांचेशी संपर्क साधावा. इच्छुकांनी 10 जुलैपर्यंत फॉर्म भरुन देणेचे  आहे.  तसेच युवती, महिलांकरिता स्वतंत्र सोय आहे. महिला प्रमुख म्हणून सौ. शितल जाधव, सौ. मनिषा खेुबुडे असून मोहीम प्रमुख म्हणून पंढरीनाथ फाटक, आनंदा थोरवत, खेबुडे, सागर जाधव आहेत. या मोहिमेत सहभागी होणार्‍या 15 वर्षाखालील मुला-मुलींनी पालकांची लेखी संमती घेऊनच फॉर्म भरणेचे आहेत. इतिहासाची जागृती तसेच निसर्गातील विविधतेची ओळख व्हावी या जाणिवेतून इचलकरंजीतील काही जाणकार मंडळी व युवकांनी मागील 29 वर्षापासून विविध गड, किल्ले, सागरी किनारा, जंगल ट्रॅक आयोजन केले जात आहे. गेले वर्षभरात त्यांनी रायरेश्‍वर, रांगणा, वासोटा किल्ला, तसेच दाजीपूर जंगल ट्रॅक, गणपतीपुळे ते रत्नागिरी सागरी किनारा ट्रॅक अशा विविध मोहिमा मराठा हायकर्सतर्फे आयोजित केल्या होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post