आज पंचगंगा नदीची पातळी सकाळी 8.00 वाजता 58 फुटावर आहे , इशारा पातळी 68, धोका पातळी 71 आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : मनु फरास :
इचलकरंजी : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ३२ फुटांपर्यंत पोहचली (इशारा पातळी ३९ तर धोका पातळी ४३ फुट). तर आज पंचगंगा नदीची पातळी सकाळी 8.00 वाजता 58 फुटावर आहे , इशारा पातळी 68, धोका पातळी 71 आहे.
आम. प्रकाश आवाडे यांचे कडून पूरस्थितीची पाहणी
इचलकरंजी : राधानगरी, कोयना धरणातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग आणि पंचगंगा नदी पाणी पातळीत होत असलेली वाढ या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी पंचगंगा नदीकाठी भेट देत पूर परिस्थितीची माहिती घेतली. पाणी पातळीत वेगाने वाढ होत चालल्याने पंचगंगा नदीला आलेल्या पुराची पाहणी करून सुचना करताना नदीक ाठावरील तसेच मळेभागातील नागरिकांनी सतर्क रहावे, अशा सूचनाही आमदार आवाडे यांनीय या वेळी केल्या.यावेळी केल्या.