इचलकरंजी येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

पाऊसमान चांगले व्हावे आणि संकटापासून सर्वजण सुखरुप रहावेत यासाठी सामुहिक प्रार्थना करण्यात आली.


प्रेस मीडिया 

 इचलकरंजी येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. पाऊसमान चांगले व्हावे आणि संकटापासून सर्वजण सुखरुप रहावेत यासाठी सामुहिक प्रार्थना करण्यात आली.

येथील स्टेशन रोडवरील इदगाह मैदानावर सकाळी हजरत सय्यद मख्नुमवली दर्गा आणि इदगाह ट्रस्ट यांच्या वतीने सामुहिक नमाज पठणचे आयोजन करण्यात आले होते. रुहानी मस्जिदचे मुफ्ती फिरोज चाँदकोटी यांनी बयान केले. तर मदिना मस्जिदचे अय्याज नाईक यांनी नमाज व दुआ पठण केले. नमाज पठणानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हजरत सय्यद मख्तुमवली दर्गा आणि इदगाह ट्रस्टचे बादशाह बागवान, अहमद मुजावर यांनी नेटके नियोजन केले होते. इदगाह मैदानासह शहरातील अन्य ठिकाणीही नमाज पठणचे आयोजन करण्यात आले होते.

नमाज पठणानंतर पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, पोलिस उपाधीक्षक बाबुराव महामुनी, अप्पर तहसीलदार शरद पाटील, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, राजु ताशिलदार, सपोनि अभिजित पाटील, शहर वाहतूक शाखेचे विकास अडसूळ, नगरपालिकेचे विजय राजापुरे, सूर्यकांत चव्हाण, संदीप मधाळे आदींनी मुस्लिम बांधवाना शुभेच्छा

Post a Comment

Previous Post Next Post