मग मागे राहतात त्या फक्त आठवणी ...
प्रेस मीडिया लाईव्ह :
आज २३ जुलै २०२२माझ्या वडिलांचा एकोणिसावा स्मृतिदिन ... कसं असतं ना ? ..माणूस जो पर्यंत आपल्या जवळ आहे तो पर्यंत त्याची आपल्याला किंमतच नसते पण एकदा माणूस कायमचा निघून गेला की मग आपल्याला त्याची आयुष्यभर उणीव भासू लागते ...मग आपण. काहीही करू शकत नाही ...मग मागे राहतात त्या फक्त आठवणी ...
आज माझ्या वडिलांच्या 19 व्या स्मृतिदिनानिमित्त मी व माझ्या भावाने ठरवलं की कुठेतरी वृद्धाश्रम किंवा अनाथालय मध्ये आपण अन्नदान करायचं.. त्यानुसार आम्ही शोधाशोध सुरू केली शेवटी कोल्हापूर महानगरपालिकेचे शहरी बेघरांसाठी ,पुरुष निवारा केंद्र, उजळाईवाडी ( शाहू टोल नाक्या जवळ)येथे आहे .आम्ही तिथे अन्नदान करायचं ठरवलं त्यानुसार आम्ही वेळही मागून घेतली आणि साधारण दुपारी एकच्या दरम्यान आम्ही तिथं पोहोचलो आणि तिथं राहत असलेल्या लोकांना आम्ही अन्नदान केलं .त्यानंतर मी तेथील कर्मचाऱ्याला माहिती विचारली.... तिथे राहत असलेल्या बेघर लोकांचा खर्च कोण करतो? त्यांना त्यांच्या जीवनावश्यक वस्तू कुठून पुरवल्या जातात ?त्या वेळी त्यांनी सांगितलं की ..राहण्याची सोय वगैरे महानगर पालिके मार्फत होते ..पण जेवणाची सोय किंवा इतर जीवनावश्यक वस्तू या सगळ्यांची सोय समाजातील संस्था, लोक देणगी किंवा डोनेशन देतात त्यातूनच हा सगळा खर्च चालवला जातो .आपण तिथे सर्व जीवनावश्यक वस्तू पासून ते नवीन जुनी कपडे ,धान्य इत्यादी स्वरूपात मदत करू शकतो. तिथे अन्नदान केल्यानंतर तिथल्या लोकांच्या चेहर्यावरचा आनंद खूप वेगळा होता .आपल्या समाजात आपल्या आजूबाजूलाच अगदी दोन वेळेच्या जेवणाची परवड होणारे लोक राहतात यासारखं दुर्देव काही नाही. जन्म आणि मृत्यू कोणालाही चुकलेले नाही मग तुम्ही कितीही गरीब असला तरी किंवा कितीही श्रीमंत असला तरीही ... प्रत्येक व्यक्तीला जन्म आणि मृत्यू या चक्रातून जावंच लागतं . माझ्या मनात त्याच वेळी खूप सारे विचार येऊ लागले की.. आपल्याला आपला कधी अंत होणार आहे हे माहित नाही तरीही ..आपण प्रत्येक गोष्टीसाठी किती कष्ट करत असतो ..प्रत्येक गोष्टींची स्वप्ने बघत असतो ..समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती सत्ता ,पद ,संपत्ति यासाठी अगदी टोकाची पावले उचलताना दिसून येतात.. आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती का थांबू शकत नाही ?म्हणजे प्रत्येकाला इतका हव्यास का ?आपण समाजात बघितलं तर प्रत्येक जण स्वतःच्या मानसिक ,शारीरिक आरोग्याचा विचार न करता फक्त आणि फक्त पैशासाठी पळताना दिसून येत आहे. खोटा दिखावा ,विलासी आयुष्य यामागे तरुणाई लागलेली दिसून येत आहे. उदाहरणच द्यायचं तर.. महाराष्ट्राच्या आत्ताच्या सरकारच तुम्ही बघू शकता की .. सत्तेसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षांमध्ये जाणारी नेतेही काही कमी नाहीत .हे कशासाठी? फक्त सत्तेसाठी.. आपल्याला जर खरच समाजासाठी कार्य करायच आहे तर.. आपण आपल्या आजूबाजूच्या चार गरीब लोकांच्या दोन वेळचा जेवणाचा खर्च जरी उचलला तरी सामाजिक कार्यात भर नक्कीच पडेल.. प्रत्येक गोष्ट आपण कशासाठी करत आहोत ? मृत्यू कुणाला चुकलेला नाहीये तर मग आपण फक्त समाधान का शोधू शकत नाही? समाधानी का राहू शकत नाही ? एका विशिष्ट लिमिट नंतर आपण पैसे कमावणे का सोडू शकत नाही?एका विशिष्ट लिमिट नंतर आपण सत्ता, संपत्ती याचा हव्यास का सोडू शकत नाही ?बाहेर लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची परवड व्हायला लागलेली आहे आपण निदान प्रत्येक बाबतीत सुखी आहे आपली निदान जेवण दोन वेळच्या जेवणाची तरी परवड होत नाही. हा विचार आपण का करत नाही ?आपल्याकडे निदान आपलं स्वतःचं कुटुंब आहे आणि आपण एकत्र चा र घास सुखाचे खात आहोत. हा आपण का विचार करत नाही?
सत्तेसाठी, पदासाठी ,पैशासाठी लोकांचा हव्यास कमी का होत नाही,? खरंच विचार करण्याची गरज आहे .तुम्हाला जर खरंच सुखात जगायचं असेल ना ..फक्त समाधान शोधा ..गरजा तर आयुष्यभर संपणार नाहीत ..आणि कधी वाटलंच तर माननीय कै मनोहर परिकर यांचे त्यांच्या अंतसमयी चे जे काही बोल होते ते ऐकायला कधीच विसरू नका .आयुष्यात कधीही समाधान महत्त्वाचं ..तुम्ही भलेही किती पैसा मिळवा, कितीही संपत्ती मिळवा ,कितीही मोठी पदे भोगा ..पण प्रत्येकाला मृत्यू हा कधीच चुकलेला नाही .म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाने जर . आपल्या स्वतःच्या मृत्यूचे भान ठेवले तर....खूप सार्या गोष्टी सोप्या होतील .आणि खूप सगळ्या गोष्टी ज्ञात होतील, म्हणून जीवनाचे महत्त्व जाणा आणि आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानायला शिका. गरीब लोकांना मदत करायला शिका कारण आपण कितीही कमावलं, कितीही मिळवलं तरी या सर्व गोष्टी आपण कधी इथल्या इथं सोडून टाकून जाऊ ?याची कुणालाच जाणीव नाही...