सरन्यायाधीशांचे सत्यकथन : संक्षिप्त प्रतिक्रिया



प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८ ५०८ ३० २९०)

भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी शनिवार ता.१६ जुलै २२ रोजी कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशियनतर्फे राजस्थानच्या विधानभवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात जे भाष्य केले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. ते म्हणाले  ' ' ' ' 'आपल्या देशात सरकार आणि विरोधक यांच्यात एकमेकांविषयीची आदराची भावना दिसून येत होती. पण आता ती लोप पावत चाललेली आहे. राजकीय दृष्ट्या केलेला विरोध म्हणजे आपल्यासाठी प्रतिकूलताच असा समाज रूढ होत चालला आहे. हे निरोगी लोकशाहीसाठी चांगले लक्ष नाही.' त्याचबरोबर त्यांनी आपल्या देशातील विधिमंडळाच्या कामगिरीच्या दर्जाबाबतही चिंता व्यक्त केली.तसेच कायदेमंडळातील कामकाजाचा दर्जा घसरत चालला असल्याचे दिसत आहे.कायदे मंजूर करताना त्यावर सखोल चर्चा होत नाही किंवा तशी छाननीही होत नाही असेही ते म्हणाले.

सरन्यायाधीशांचे म्हणणे देशी वर्तमानात अतिशय खरंआहे.एका अर्थाने ती केलेली कानउघडणी आहे. कारण भारतीय राज्यघटनेतील लोकशाहीपासून  धर्मनिरपेक्षतेपर्यंत आणि संघराज्यीय एकात्मतेपासून समाजवादापर्यंतच्या सर्वच मूल्यांना अतिशय पद्धतशीरपणे खिळखिळे  केले जात आहे. संवैधानिक मूल्यांचे रक्षण करणे यात सत्ताधारी वर्गाची जबाबदारी अधिक असते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात घटनेलाच वारंवार तडा देण्याचे काम जर होत असेल तर सरन्यायाधीशांच्या खड्या बोलाप्रमाणेच सर्वसामान्य जनतेनेही त्याबाबतचा जाब विचारण्याची गरज आहे. कारण हा देश शेवटी या देशातील सर्व नागरिकांचा आहे. 'आम्ही भारतीय लोकानी ही घटना तयार करून  स्वतःप्रत अर्पण केलेली आहे.याचे भान ठेवणे आणि तसा वर्तन व्यवहार करणे ही काळाची गरज आहे.


Post a Comment

Previous Post Next Post