अधिकाऱ्यांवरच झालेल्या कारवाईमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मनु फरास :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या बांधकाम खात्यातील उपनगर अभियंता प्रविण बैले यांनी त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीत हलगर्जीपणा केल्याबद्दल आयुक्त सुधाकर देशमुख यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. अवघ्या काही आठवड्यातच अधिकाऱ्यांवरच झालेल्या कारवाईमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. तर या कारवाईमुळे शहर वासियांतून समाधान व्यक्त केले जात असून अशाच प्रकारे आयुक्तांनी महापालिकेवर अंकुश ठेवावा अशी मागणी होत आहे.
इचलकरंजी नगरपालिकेचे नुकतेच महापालिकेत रुपांतर करण्यात आले असून महापालिकेचे आयुक्त म्हणून देशमुख यांनी पदभार स्विकारला आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी महापालिका पध्दतीनुसार आयुक्तांच्या कारवाईने नागरीकांतून समाधान कामकाजासाठीची कडक भूमिका घेतली आहे. अनेक वर्षापासून नगरपालिकेत काम करुन सवय जडलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिका कामकाजाचे वळण लागावे यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करुन त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्याच अनुषंगाने उपनगरअभियंता बैले यांना कचरा डेपो (मैल खड्डा) येथील काम देण्यात आले होते. परंतु त्यांनी ते काम वेळेत पूर्ण केले नाही. शिवाय त्याचा अहवालही दिला नसल्यामुळे कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत आयुक्त देशमुख यांनी बैले यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
दरम्यान, नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करुन शौचालय बांधल्याबद्दल भागातील नागरिकांनी तक्रार केलेल्या कर्मचाऱ्यांचीसुध्दा चौकशी सुरु आहे. त्यामध्ये दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही आयुक्त देशमुख यांनी सांगितले.