प्रेस मीडिया लाईव्ह :
मनु फरास :
इचलकरंजी : येथील स्टेशन रोडवरील डेक्कन चौक परिसरात रस्त्याकडेच्या पदपथावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी कित्येक वर्षांपासून ठाण मांडत केलेले अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने शनिवारी हटविले. यावेळी विक्रेते आणि पथकातील कर्मचारी यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला, पण विरोधाला न जुमानता तेथे असलेले खाद्यपदार्थाचे गाडे, छप्पर, पत्रे सर्व साहित्य काढण्यात आले.
दरम्यान, याठिकाणी दिवसभरात कोणीही गाडे उभे करु नयेत अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत. अतिक्रमण विरोधातील या मोहिमेला भाजीपाला, फळविक्रेते यासह जीवनावश्यक वस्तु विक्रेत्यांकडून विरोध होऊ लागल्याने अखेर पोलिस बंदोबस्त घेण्यात आला आहे.अतिक्रमण हटविण्याबाबत अनेक वेळातात्पुरती कारवाई केली जायची. आज इचलकरंजीतील मुख्य रस्त्यासह विविध कारवाई केली की उद्या पुन्हा त्याठिकाणी चौक, सार्वजनिक ठिकाणांसह गड़ीबोळात तेच अतिक्रमण ठरलेले असायचे. अडथळा ठरणारी ही बेकायदेशीर अतिक्रमणे केल्यानंतर विक्रेत्यांनी त्याला विरोध हटविण्याबाबत महापालिकेचे प्रशासक दर्शविला. यामुळे कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये वाद झाला.सुधाकर देशमुख यांनी आदेश दिले आहेत. वाद झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला
अतिक्रमण निर्मुलन पथकाने परिसरातील पदपथावर थाटलेले अतिक्रमण हटवत छपन्या, पत्रे ताब्यात घेतले. याचप्रमाणे परिसरात चिकन ६५, बिर्याणीच्या गाड्याही आहेत. या विक्रेत्यांनी दिवसा व्यवसाय सुरू असल्याचा दिखावा केला. मात्र या गाड्या दिवसा रस्त्याकडेला न लावण्याबाबत स्टेशन रोडवरील डेक्कन चौक परिसरात प्रशासनाने स्थलांतरीत करता येईल असे गाडे लावण्यास विक्रेत्यांना परवानगी दिली होती. मात्र अनेक वर्षापासून त्याच ठिकाणी सुचना करून पुन्हा निदर्शनास आल्यास त्या जम करण्याचा इशारा पथक प्रमुख गाडे लावण्यासह छप्पर व पत्रे मारून डेक्कन चौकाने घेतला मोकळा श्वास
डेक्कन चौकात गेल्या काही वर्षापासून मोठ्याप्रमाणात खाद्यपदार्थाचे हातगाडे लावण्यात आले होते. त्यामुळे सदर रस्त्यावर वारंवार वाहतुक कोडी होत होती. मात्र महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने सदर हातगाड्यांवर कारवाई केल्याने डेक्कन चौकाने कित्येक वर्षानंतर मोकळा श्वास घेतला. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.