इचलकरंजी पञकार कवि मंचच्या काव्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्कृष्ट काव्य सादरीकरणाने उपस्थितांची मिळवली वाहवा

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे इचलकरंजी पञकार मंचच्या वतीने नवोदित कवी - कवयिञींसाठी आयोजित केलेल्या काव्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी सहभागी कवींनी सामाजिक आशयावर आधारित उत्कृष्ट काव्य सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली.


इचलकरंजी शहर परिसरातील नवोदित कवी - कवयिञींसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे,या उद्देशाने इचलकरंजी येथे श्रमिक पत्रकार संघ व इचलकरंजी प्रेस क्लब या दोन्ही संघटनांच्या वतीने  इचलकरंजी पञकार कवी मंचच्या माध्यमातून महापालिकेच्या पञकार कक्षामध्ये काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर स्वागत व प्रास्ताविकात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र ठिकणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत चांगले साहित्यिक व कलाकार घडवण्यासाठी यापुढेही निश्चित प्रयत्न राहिल ,अशी ग्वाही दिली.

यानंतर सहभागी कवी - कवियञींनी महापुर , शेतकरी , कष्टकरी ,वृक्षतोड , माणुसकी,शिक्षण , स्वच्छता , पाऊस, स्वातंत्र्य , दुरावलेले नातेसंबंध, दुष्काळ , पाणी टंचाई, लोकशाही व बदलती दुनिया अशा सातत्याने समाजाला भेडसावणाऱ्या विविध विषयांना आपल्या काव्याच्या उत्कृष्ट सादरीकरणातून स्पर्श करत त्यातून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत उपस्थितांची वाहवा मिळवली.यामध्ये मनिषा केसरकर ,सुवर्णा पोवार , धोंडिबा कुंभार , दादासाहेब जगदाळे ,संजय बत्ते,भाऊसाहेब केटकाळे, बाळकृष्ण म्हेत्रे, बसवराज कोटगी, दस्तगीर नदाफ ,सागर बाणदार , वृषाली होगाडे ,विलास सुतार , बळीराम कदम ,सात्ताप्पा सुतार , रविंद्र पडवळे ,पाटलोबा पाटील , रामचंद्र ठिकणे यांचा समावेश होता.यावेळी कवी गुणवंत जगताप यांनी लावणी , भारुडकार धर्मराज जाधव यांनी भारुड ,ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी गझल आणि सामाजिक कार्यकर्ते अहमद मुजावर यांनी शेर सादर करत या काव्य संमेलनाला आणखी रंगत आणली.

यावेळी पञकार अजय काकडे ,बाळासो पाटील , रविकिरण चौगुले , सुभाष भस्मे, संतोष काटकर , पंडित कोंडेकर , ऋषीकेश राऊत,अमर चिंदे ,शिवाजी येडवान ,मनोहर जोशी , सलिम संजापूरे यांच्यासह कवी - कवयिञी , साहित्यिक व साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडिबा कुंभार यांनी तर आभार प्रदर्शन पञकार शिवानंद रावळ यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post