ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या वतीने स्वागत करत साखर-पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
राज्यात या पुढे होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाने ओबीसी समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून न्यायालयाच्या या निर्णयाचे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या वतीने स्वागत करत साखर-पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
ओबीसी आरक्षण संस्थगित केल्यामुळे ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारने माजी मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोगाची नियुक्ती करून एम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे जबाबदारी दिली होती. त्यानुसार आयोगाने राज्यातील 1960 पासून ओबीसी समाजाचे राजकीय मागासलेपणा बाबतचा सविस्तर अहवाल तयार करून शासनास सादर केला होता. या अहवालानुसार राज्यामध्ये राजकीय आरक्षण देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेणेबाबत न्यायालयाने नुकतेच आदेश दिल्याने ओबीसी आरक्षणाचा पेच सुटला आहे. या निर्णयाबद्दल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे शहर अध्यक्ष फरीद मुजावर यांच्या नेतृत्त्वाखाली कॉ. मलाबादे चौक येथे साखर-पेढे वाढत आनंद साजरा करण्यात आला.
-