आमदार संजय शिरसाट, विजय चौगले यांच्यासह पदाधिकार्यांची प्रमुख उपस्थिती
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
मुंबई येथे मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने शिंदे - फडणवीस युती राज्य सरकारला पाठिंबा देत नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते चांदीची गदा देवून सत्कार करण्यात आला.यावेळी नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते , मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले , कार्याध्यक्ष सुरेश धोञे , प्रदेश सरचिटणीस ,माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात सत्तांतर होवून शिंदे - फडणवीस युती सरकार सत्तेवर स्थानापन्न झाले आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.याच अनुषंगाने मुंबई येथे मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने शिंदे - फडणवीस युती राज्य सरकारला पाठिंबा देत नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते चांदीची गदा देवून सत्कार करण्यात आला.तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सत्कारमूर्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील वडार समाजाच्या सर्वांगीण उन्नतीबरोबर युवा वर्गाला स्वावलंबी जीवन जगण्यासाठी उद्योगांना आर्थिक स्तोत्र निर्मिती करून आवश्यक असणाऱ्या सर्व प्रमुख बाबींची पूर्तता करू,अशी आश्वासक ग्वाही दिली.
यावेळी नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते , मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले , कार्याध्यक्ष सुरेश धोञे , प्रदेश सरचिटणीस ,इचलकरंजी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार ,युवा नेते शंतनू पोवार ,माजी नगरसेवक मारुती पाथरवट यांच्यासह मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे कोल्हापूर जिल्हा सदस्य दिपक शिंगाडे , सचिन पोवार ,संजय शिंगाडे , शेखर विजापुरे यांच्यासह अन्य पदाधिकारी , सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.