इचलकरंजी रोटरी इनरव्हिल क्लबतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

  इनरव्हिल क्लबने उपक्रमातून घडवले सामाजिक बांधिलकीचे दर्शन



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी/ प्रतिनिधी 

इचलकरंजी रोटरी इनरव्हिल क्लबच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ.सुरेखा कुंभार यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमातून इनरव्हिल क्लबने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे.

इचलकरंजी येथील रोटरी इनरव्हिल क्लबच्या वतीने महिलांसह युवतींच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात.विशेष म्हणजे आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक विषयांवर विविध माध्यमातून प्रबोधन करतानाच नाविण्यपूर्ण उपक्रमातून समाजातील विविध घटकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न केला जातो.शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहतानाच मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात.

सरकारी शाळा दत्तक घेवून त्याठिकाणी मुलभूत सुविधा पुरवण्या बरोबरच शैक्षणिक सामुग्री उपलब्ध करुन देणे ,गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवले जाते. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नुकताच इचलकरंजी रोटरी इनरव्हिल क्लबच्या वतीने समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.जिल्हा परिषद लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ. सुरेखा कुंभार यांच्या हस्ते व इनरव्हिल क्लबच्या प्रेसिडेंट सौ. स्नेहा मराठे  व सेक्रेटरी सौ. मुग्धा शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. सुरेखा        कुंभार यांनी मुलांना विविध उदाहरणांव्दारे शिक्षणाचे महत्व पटवून देत निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रयत्नात सातत्य ठेवल्यास यशस्वी होता येते ,असा यशाचा मुलमंञ दिला.यावेळी त्यांनी मुलांना आपले दप्तर कसे ठेवावे ,निटनेटके कसे रहावे याविषयी आपल्या कवितेतून स्पष्टीकरण दिले.तसेच मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी पालक म्हणून सजगपणे कर्तव्य बजावणे अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले.यावेळी रोटरी इनरव्हिल क्लबच्या सदस्या प्रेमलता सारडा , अंजली लाहोटी यांच्यासह  विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post