पञकार संघातर्फे रामचंद्र ठिकणे यांची माहिती
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथे इचलकरंजी शहर पञकार संघातर्फे शहर परिसरातील ज्येष्ठ व नवोदित कवींसाठी गुरुवार दिनांक १४ जुर्ले रोजी पञकार कक्षामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र ठिकाणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
इचलकरंजी शहरातील पञकार संघातर्फे दरवर्षी पञकार दिन साजरा करण्याबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.याशिवाय विविध सामाजिक उपक्रम राबवण्यावर देखील विशेष भर देण्यात येतो.याच अनुषंगाने इचलकरंजी शहर परिसरातील ज्येष्ठ व नवोदित कवींसाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने
गुरुवार दिनांक १४ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता जुन्या नगरपालिका इमारतीमध्ये असणा-या पञकार कक्षामध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती पञकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पञकार रामचंद्र ठिकणे यांनी दिली आहे या संमेलनात सहभागी कवींनी स्वरचित सामाजिक विषयावरील कविता सादर करावयाच्या आहेत.
या संमेलनात प्रवेश नि:शुल्क राहणार आहे.
तरी या कवी संमेलनात सहभागी होवू इच्छिणाऱ्या इचलकरंजी शहर परिसरातील ज्येष्ठ व नवोदित कवींनी आपली नावे पत्रकार कक्ष येथे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र ठिकणे यांच्याकडे 9822235545 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून किंवा इचलकरंजीतील अन्य पत्रकारांकडे बुधवार दिनांक १३ जुलैपर्यत नोंदवावीत ,असे आवाहन देखील इचलकरंजी पञकार संघातर्फे करण्यात आले आहे.