संभाव्य आपत्तीच्या काळात जीव सृष्टीच्या संरक्षणासाठी

शहरातील सर्व शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एक दिलाने काम करणेत येणार .

     प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरामध्ये आलेल्या मागील काही वर्षाच्या महापुराच्या  पार्श्व भूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार संभाव्य महापुराचा व अतिवृष्टीचा सामना करणे साठी इचलकरंजी महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवणेच्या सुचना प्रशासक तथा  प्रभारी अधिकारी सुधाकर देशमुख यांनी दिले .

या अनुषंगाने आज गुरुवार दि.७  जुलै रोजी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम २०२२ अंतर्गत पुर्वतयारी आढावा बैठकीचे  आयोजन  करणेत आले होते.   इचलकरंजी महानगरपालिका आपत्कालीन विभागा कडे यांत्रिक बोटी , साधी फायबर बोट, स्टिल कटर, वुड कटर ,लाईफ जॅकेट, रिफ्लेक्टीव्ह जॅकेट, लाईफ रिंग, दोर, मेगा फोन, गळ, ट्यूब, इमर्जन्सी लॅम्प, स्नेक हँगर,टॉर्च, स्लायडिंग शिडी , बायनाक्युलर  ईत्यादी साहित्य तसेच फायर बुलेट, फायर फायटर, रुग्ण वाहिका, हायड्रोलिक प्लॅटफार्म,औषध फवारणी ट्रॅक्टर,सक्शन ट्रॅक्टर याचा  समावेश आहे. 

 यावेळी सर्व यंत्रसामग्री सुस्थितीत असले बाबतची माहिती प्रभारी अधिकारी तथा प्रशासक   सुधाकर देशमुख यांनी घेवुन महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचे

अचूक नियोजन करणेच्या  त्याचबरोबर जीवसृष्टीच्या रक्षणा साठी शहरातील सर्व शासकीय यंत्रणा सामाजिक तथा स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून एक दिलाने काम करण्याचे आवाहन केले. तसेच महानगरपालिके कडून सर्व शासकीय यंत्रणांना सर्वोतोपरी सहकार्य करणेची ग्वाही दिली.

 याप्रसंगी  अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड,  उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, उपायुक्त डॉ. प्रदीप पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी, महावितरणचे  कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद कुंभार, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक विकास अडसूळ सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एल. गाडवे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, नगर रचनाकार रणजित कोरे,आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, विद्युत अभियंता संदिप जाधव,  जल अभियंता अंकिता मोहिते, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील, उपनगर अभियंता राजेंद्र गवळी,संजय कांबळे उपस्थित होते.


  

Post a Comment

Previous Post Next Post