नागरिकांची कामे होत नाहीत , नागरिक सुपात व मनपाचे पदाधिकारी तुपात अशी परिस्तिथी आहे
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : मनु फरास :
इचलकरंजी महानगरपालिका मधील सर्व पदाधिकारी वर्षानुवर्षे एकाच खात्यात एकाच टेबलावर ठाण मारुन बसलेले आहेत. त्यांची बदली होतच नाही , ते मनपाचे जावई आहेत असे वाटू लागले आहे यांच्या मागे कोण आहे ? कोणाचा आशिर्वाद आहे ..? हे गुपीतच आहे . नागरिकांची कामे होत नाहीत , नागरिक सुपात व मनपाचे पदाधिकारी तुपात अशी परिस्तिथी आहे
एखाद्या कामासाठी जर महापालिकेत जाण्याची वेळ आली तर बरोबर माहिती ने देणे , हे काम माझे कडे नाही , तुम्ही या मोबाईल नंबर वर फोन करा , त्याला फोन केला तर या म्हणतात गेल्यावर हे काम माझे कडे नाही असे सांगून आपली जबाबदारी झटकून टाकतात. अशा सर्व प्रकारा मुळे सर्व सामान्य नागरिक वैतागलेले आहेत. त्यामुळे या बाबत आयुक्तांनी लक्ष घालण्याची जास्त गरजेचे आहे . तसेच एकाच ठिकाणी सर्व पदाधिकारी ठाण मांडून बसले आहेत त्यांची पण आता चौकशी झाली पाहिजे तरच सर्व सामान्य माणसाला न्याय मिळेल व त्यांची कामे सुद्धा होतील.
Tags
Ichalkaranji-