इचलकरंजीत अल्टीमेट खो-खो‘ स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार

 खेळाडू व प्रशिक्षकांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द 

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रो कबड्डीच्या धर्तीवर बालेवाडी (पुणे) येथे 14 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणार्‍या ‘अल्टीमेट खो-खो‘ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या देशभरातील नामांकित सहा संघात केवळ इचलकरंजीतील 22 खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा प्रकाश आवाडे क्रीडा अकादमी व डीकेटीई संस्था यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच निवड झालेले खेळाडू व प्रशिक्षकांना कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रत्येकी 10 हजार रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.अध्यक्षस्थानी डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय खेळाडू कल्लाप्पाण्णा आवाडे होते.

इचलकरंजी नगरी ही वस्ञोद्योगाबरोबरच विविध स्पर्धा ,कला क्षेञासाठी देखील प्रसिद्ध आहे.याची चुणूक शहरातील खो- खो खेळाडूंनी दाखवून दिली आहे. प्रो कबड्डीच्या धर्तीवर बालेवाडी (पुणे) येथे 14 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणार्‍या ‘अल्टीमेट खो-खो स्पर्धा संपन्न होणार आहेत.या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या देशभरातील नामांकित सहा संघात केवळ इचलकरंजीतील 22 खेळाडूंचा समावेश आहे.

अल्टिमेट खो-खो स्पर्धेसाठी विविध संघात निवड झालेल्या खेळाडूंमध्ये ए कॅटेगरी : अभिजित पाटील, रोहन शिंगाडे, रोहन कोरे, राजवर्धन पाटील, सुशांत हजारे. बी कॅटेगरी : सागर पोतदार, निलेश जाधव, अवधूत पाटील, सौरभ आढावकर, विजय हजारे. सी कॅटेगरी : अभिनंदन पाटील, मझहर जमादार, अमित पाटील, आदर्श मोहिते, मनोज पाटील, शैलेश संकपाळ, अविनाश देसाई, विनायक पोकार्डे. डी कॅटेगरी : सुशांत कलढोणे, प्रसाद पाटील, प्रितम चौगुले, निलेश पाटील यांचा समावेश आहे.

या सर्व खेळाडूंचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा प्रकाश आवाडे क्रीडा अकादमी व डीकेटीई संस्था यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच निवड झालेले खेळाडू व प्रशिक्षकांना कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रत्येकी 10 हजार रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी ,वस्त्रनगरीबरोबरच खो-खो ची पंढरी असा नांवलौकिक असलेली इचलकरंजी वस्त्रोद्योगासोबतच क्रीडा क्षेत्रातही अव्वल असेल असा विश्‍वास व्यक्त करत आमदार प्रकाश आवाडे यांनी लवकरच डीकेटीई संस्थेच्या वतीने तारदाळ येथे स्पोर्टस् कॉलेज आणि इचलकरंजीतील नारायण मळा येथे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स सुरु करण्यात येत असल्याचे सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी एखाद्या स्पर्धेसाठी इतक्या मोठ्या संख्येने निवड झाल्याने इचलकरंजीच्या क्रीडा इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे. म्हणूनच अल्टिमेट खो-खो स्पर्धेतील ‘बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ चा बहुमान हा इचलकरंजीचाच असावा , अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. कोल्हापूर खो-खो असोशिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर यांनी, असोशिएशन व इचलकरंजीतील खेळाडूंचा इतिहास मांडत मॅटवरील खो-खो च्या सरावासाठी एखादा मोठा हॉल उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली.

यावेळी डीकेटीई संस्थेच्या मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे, सौ. मौश्मी आवाडे, कोल्हापूर खो-खो असोसिएशनचे गुंडाप्पा हातरोटे,प्रा.शेखर शहा ,डीकेटीई संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले ,हरीहर होगाडे, जी. जी. कुलकर्णी, गोपाळ नागवेकर, हेमंत भांडवले, सुनिल पाटील, श्रीशैल कित्तुरे, तात्या कुंभोजे आदींसह खेळाडू, पालक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post