प्रेस मीडिया लाईव्ह
रमेशकुमार मिठारे
इचलकरंजी येथील अग्रसेन भवनात दिनांक 8 जुलै ते 10 जुलै या तीन दिवशीय निःशुल्क निवासी ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या निवाशी ध्यान शिबिरा साठी ब्रम्हश्री सुभाष पत्रिजी यांचे शिष्य ब्राम्हश्री राघवेंद्र राव आंध्रप्रदेश येथून आले होते. गेली 20 वर्षे राघवेंद्र राव हे नि:स्वार्थ पणे ध्यान व शाकाहाराचा प्रचार PSSM (pyramid spiritual sosiety movement)च्या माध्यमातून करत आहेत. त्यांनी ध्यान कसे करायचे ?ध्यान कोणी करायचे? ध्यान किती वेळ करायचे ?ध्यानाचे फायदे काय? ध्यान करण्याच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत त्याआपणास संभ्रमित करतात म्हणून यापैकी नेमकी ध्यानाची योग्य पद्धत कोणती? भगवान म्हणजे काय? तो कोठे असतो ?तसेच कर्मकांड करायचे काय? याचे सविस्तरपणे साध्या सोप्या व सरळ भाषेत उदाहरणासह सांगितले व ध्यान करून घेतले .
आपण तीन-तीन तास ध्यानात बसू शकतो हे त्यांनी आम्हाला शिकवले व करून घेतले शाकाहाराचे महत्त्व सांगितले .ध्यान ही काही अवघड गोष्ट नाही .ध्यान कुणीही करू शकतो .साधे ,सरळ सोपे असे हे आनापानसती ध्यान आहे.(आना म्हणजे श्वास आत घेणे ,अपाना म्हणजे श्वास बाहेर सोडणे ,सती म्हणजे एकरूप होणे हा पाली शब्द आहे )यामध्ये मांडी घालून बसायचे किंवा खुर्चीत किंवा सोप्यावर बसून पायाची अडी घालून व हाताची बोटे एकमेकात घालून(finger lock) डोळे बंद करून बसायचे व फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचे. श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे विचार कमी होऊन मन खाली होते. डोळे बंद केल्यामुळे शरीराच्या क्रिया थांबतात विचार कमी होऊन मन खाली होते म्हणजेच आपण फक्त आत्म्याशी एकरूप होतो. म्हणजेच श्वासाकडे लक्ष देऊन मन खाली करून आत्म्याशी एकरूप होणे म्हणजेच ध्यान .आत्मा म्हणजेच भगवंत या भगवंताशी जोडले जाणे म्हणजेच ध्यान. भगवंताशी एकरूप होण्यासाठी ध्यान करायचे असते. शरीर ,आत्मा व मन या संबंधी सविस्तर माहिती सांगीतली. ध्यान केल्यामुळे मनोविकार व्याधी बऱ्या होतात .तणावमुक्ती व आजारापासून सुटका होते .जाती धर्म पंथ श्रद्धा इत्यादी मान्यतांचा अडथळा न येता आचरण्यात येण्याजोगी साधी सोपी नैसर्गिक पद्धत म्हणजेच ध्यान. ध्यानामुळे मन शांत होते. शारीरिक व मानसिक आजार बरे होतात. स्मरणशक्ती वाढते एकाग्रता व आत्मविश्वास वाढतो निरपेक्ष मैत्रीपूर्ण तणावमुक्त व आरोग्यपूर्ण जीवन जगता येते बुद्धीचा विकास होतो अध्यात्मिक उन्नती होते म्हणून सर्वांनी कमीत कमी आपल्या वयाएवढी मिनिटे तरी ध्यान करावे उदाहरणार्थ ६० वर्षे वय ६० मिनिटे ध्यान जास्तीत जास्त आपण कितीही वेळ ध्यान करू शकतो. या कार्यक्रमाचे आयोजन अनिल जाधव ,संजय पोद्दार, शंकर उडुपी ,जयप्रकाश गोयंका यांनी केले .या शिबिरासाठी सांगली ,सातारा, कोल्हापूर ,पुणे,अहमदाबाद व इचलकरंजीच्या आसपासच्या जवळ जवळ 75 लोकांनी लाभ घेतला. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी अनेक लोकांची मदत झालेली आहे. अग्रसेन भवन चे अध्यक्ष पवन टिबरेवाल यांनी या कार्यक्रमासाठी मोफत हॉल व राहण्याची सोय करून दिली.अनिल जाधव, संजय पोद्दार ,डॉ. अर्जुन कुंभार ,डॉ. कारेकर,high court advocate ताजुंनिसा शेख विजयवाडा आंध्र प्रदेश, जयप्रकाश गोयंका ,डॉ अमित राठी ,विजयकुमार सोनी, भैरू शेठ अग्रवाल, एपीआय ठोंबरे , संदीप जैन यांचे मोलाचे सहकार्य लाभले चिरंजीवी यांनी गुरुजींच्या तेलगूचे हिंदीमध्ये खूप छान भाषांतर करून सांगितले शिबिरामध्ये आलेल्यांचे अनुभव कथन ऐकले .कार्यक्रमांमध्ये दहा ते पंधरा लोकांनी मांसाहार बंद करण्याची शपथ घेतली. पवन टीबरेवाल यांनी आभारप्रदर्शन करून ध्यान शिबिराची सांगता केली. ध्यानामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये व शहरांमध्ये काय बदल होतात हे आपण कृपया युट्युब वर महर्षी ईफेक्ट व्हिडिओ जरूर पहावा असे संयोजकांनी आवाहन केले.