श्री.अशोक ठोमके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला .
प्रेस मीडिया लाईव्ह :
हातकणंगले तालुका प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
इचलकरंजी ता.हातकणंगले येथील लोकक्रांती विकास आघाडीच्या वतीने रुई ता हातकणंगले येथील सहारानगर भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशन (संयुक्त राष्ट्रसंघ संलग्न )चे राष्ट्रीय गव्हर्नर आणि वेदगंगा टेक्स्टाईल पार्क नेज (कर्नाटक )चे चेअरमन मा.श्री.दिलावर बाबासाहेब मकानदार यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले*
बँकॉक (थायलंड ) येथे एशिया पॅसिफिक शिक्षण परिषदेत डल्स युनिव्हर्सिटीच्या वतीने मानवाधिकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मा. श्री.दिलावर मकानदार यांना मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले बद्दल लोकक्रांती विकास आघाडीचे अध्यक्ष दत्ता मांजरे (तारदाळकर) व उपाध्यक्ष नागेश क्यादगी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर लोकक्रांती विकास आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.अशोक ठोमके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी दत्तात्रय गोडबोले, अरुणा जाधव, नागेश हजारे, दिलीप रोपे, मुकुंद शेडगे, शबाना शहा, नेहा मुजावर, सुरेश इंगळे, संगीता आवळे, सलीम माणगावे व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.