प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ. बानू नदाफ : ( हातकणंगले. ता.प्रतिनिधी ) :
हातकणंगले पंचायत समितीच्या २४ गणांतील आरक्षण सोडत नुकतीच तहसील कार्यालयात झाली . चार मतदारसंघ अनुसूचित जाती, सहा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर उर्वरित १४ मतदारसंघ सर्वसाधारण गणासाठी आरक्षित झाले मतदारसंरचनेत गावाची झालेली अदलाबदल या कारणाने वारंवार अनेक गावावर आरक्षणाने अन्याय होत असल्याच्या हरकती घेतल्या प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार कल्पना ढवळे, अपर तहसीलदार शरद पाटील, निवासी नायब तहसीलदार दिगंबर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सोडत झाली.
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रथम अनुसूचित जातीचे आरक्षण केले. मतदारसंत्र रचने दरम्यान गावाची झालेली अदलाबदल आणि कचनूर, शिरोली, रेंदाळ, पट्टणकोडोली मोठ्या लोकसंख्येच्या गावांत दोन दोन मतदारसंघ निर्माण झाल्याने छोट्या गावांवर आरक्षणाने अन्याय होत असल्याचा मुद्दा कार्यकर्त्यांनी लवून घरला .
गणनिहाय आरक्षण
● आळते, शिरोली दक्षिण, साजणी, रेदाळ पूर्व अनुसूचित जाती
● नवे पारगाव, भादोले, बंदूर नागरिकांचा मागास प्रवर्ग
● पाठार वडगांव, नरदे, कोरोची नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
• घुणकी, सावतें, कुंभोज, तारदाळ, पट्टणकोडोली पूर्व आणि पश्चिम,
रेंदाळ पश्चिम सर्वसाधारण
• टोप. हेरले, स्कडी, शिरोली उत्तर, कबनूर पूर्व आणि पश्चिम,
माणगाव सर्वसाधारण महिला