इचलकरंजी शहर परिसरात सतत होत असलेल्या पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन सतर्क राहण्याच्या सुचना.
प्रेस मीडिया लाईव्ह :
हातकणंगले तालुका प्रतिनिधी :श्रीकांत कांबळे
इचलकरंजी शहर परिसरात गेले काही दिवस होत असलेल्या सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. आज गुरुवार दिनांक १४ जुलै रोजी पंचगंगा नदीची पाणी पातळी ६२.०६ फुट इतकी झालेली आहे.नदीचे पाणी नागरी वस्तीत शिरण्याची शक्यता असलेने आज महानगरपालिकेचे प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांचे समवेत पंचगंगा नदी पुल येथील पुर परिस्थितीची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापन कडील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क राहणेच्या सुचना दिल्या.
त्याचबरोबर श्रीमंत घोरपडे नाट्यगृह, तांबे माळ प्राथमिक शाळा या पूरग्रस्त छावणीस भेट देऊन सदर ठिकाणी सर्व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देणेच्या सुचना संबंधित विभाग प्रमुख यांना दिल्या.
याप्रसंगी कामगार अधिकारी विजय राजापुरे, नगरअभियंता संजय बागडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार,मुख्य स्वच्छता निरिक्षक सुर्यकांत चव्हाण, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, स्वच्छता निरिक्षक विजय पाटील,संजय शेटे आदी उपस्थित होते.