प्रेस मीडिया लाईव्ह :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार पट्टणकोडोली येथे पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना *शिवसेना मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले " उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है। तसेच शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा जोमाने कामाला लागू असेही ते म्हणाले.
तसेच शिवसेनेच्या विरोधात बंड केलेल्या आमदारांना मतदार संघात फिरू देणारा नाही असे मत शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी हातकणंगले विधानसभा संपर्क प्रमुख प्रवीण देसाई, उपजिल्हाप्रमुख सत्ताप्पा भवान,तालुका प्रमुख बाजीराव पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक शिंगारे आण्णा,मा.जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण,नगरसेवक सौ पूनम पाटील ताई,संदीप पाटील, उप तालुका प्रमुख संदीप शेटे,शहर प्रमुख अमोल देशपांडे,आण्णा जाधव,महिला तालुका प्रमुख उषाताई चौगुले,उपतालुकाप्रमुख,सर्व विभाग प्रमुख,शहर प्रमुख युवा शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, गटप्रमुख, बुथप्रमुख शाखा प्रमुख उपशाखाप्रमुख शिवसेना,युवासेना,महिला आघाडी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.