रेंदाळ मध्येग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह..

रेंदाळचे वैभव असणारे गावतळे अखेरच्या घटका मोजत आहे

सांडपाणी तळ्यात सोडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 



प्रेस मीडिया लाईव्ह :

  ऐन पावसाळ्यात रेंदाळ मध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. खराब रस्ते, गटारी, उघड्यावर पडलेला कचरा यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यातच सांडपाणी तळ्यात सोडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेंदाळ गावात वेळेवर कचरा उठाव होत नाही. गटारी रस्त्यावरुन वाहत आहेत. मुळात बहुतांश प्रभागात चालण्यासाठी रस्ताच नाही. त्यातच सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. रस्त्यावर सगळा चिखल झाला आहे. यातून चालण्याची जीवघेणी कसरत सुरू आहे. यामुळे नागरिक वैतागले आहेत. 

रेंदाळचे वैभव असणारे गावतळे अखेरच्या घटका मोजत आहे. हा श्रमाचा साक्षीदार असलेला अमूल्य ठेवा जपण्यासाठी लोक प्रतिनिधींची राजकीय इच्छाशक्ती लोप पावली आहे. सांडपाण्याचे नियोजन करण्याऐवजी अनेक प्रभागातील सांडपाणी या तळ्यात सोडले आहे. यामध्ये तळे वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आता तर तळ्याच्या जवळच चक्क नळे टाकून सांडपाणी तळ्यात सोडण्याचा भीम पराक्रम रेंदाळ ग्रामपंचायतीने केला आहे. यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post