इंदापूर शहरात महिला पदाधिकाऱ्याने शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे यांच्याच विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला

 त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे 


प्रेस मीङिया लाईव्ह: 

जब्बार मुलाणी

इंदापूर तालुक्यातीलच संघटनेची पदाधिकारी असलेल्या महिलेने यासंदर्भात इंदापूर पोलिसांकडे फिर्याद दिली असून त्यावरून पोलिसांनी बोंद्रे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे

एकीकडे शिवसेनेत राज्यभर गळती सुरू असताना व हकालपट्ट्यांचे सत्र सुरू असताना इंदापूर शहरात तर १४ जुलै रोजी झालेल्या घटनेवरून महिला पदाधिकाऱ्याने २३ जुलै रोजी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे यांच्याच विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सगळीकडे  एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना १४ जुलै रोजी पक्ष कार्यालयात घडली असल्याचे या फिर्यादी महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. पक्षाच्या आठ महिला पदाधिकारी कार्यालयात असताना बोंद्रे यांनी आपल्याला उद्देशून मी सांगेल तसेच वागायचे, इतर कोणाचेही ऐकायचे नाही, अन्यथा पक्षातून हकालपट्टी करेल अशी धमकी दिली व त्यानंतर महिला फोटो काढत असताना पाठीमागे उभे राहून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले अशी फिर्याद या महिलेने दिली आहे.

गटबाजीतून हे कृत्य - विशाल बोंद्रे

दरम्यान शिवसेनेचे नेते विशाल बोंद्रे यांनी हा आरोप फेटाळला. ते म्हणाले, ३५ वर्षे मी समाजकारणात आहे. संपूर्ण तालुका मला ओळखतो, मी कसा आहे हे सर्वांना माहिती आहे. माझे तालुक्याच्या संघटनेवरील असलेले वर्चस्व लक्षात घेऊन गटबाजी करणाऱ्यांनी हे कृत्य केले आहे. मात्र यातून माझे कुटुंब उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामुळे मी उद्वीग्न झालो आहे. अशीच जर सवय लागली, तर कोणीही कोणालाही उध्वस्त करु शकतात. आता यावर मी काय बोलू?

Post a Comment

Previous Post Next Post