राज्यातील मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केल्याचे समजते.
प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा : सुनील पाटील
पनवेल जवळील अजिवली हद्दीतील नवकार लॉजिस्टिक मधून परदेशातुन अवैधरित्या आयात केलेले ३६२.५९ कोटी रुपयांचे हेरॉईन नामक अंमलीपदार्थ हस्तगत करण्यात आला असून हा राज्यातील मोठा साठा नवी मुंबई पोलिसांनी हस्तगत केल्याचे समजते.
गुन्हे शाखा, नवी मुंबई येथे पंजाब पोलीसांचे स्पेशल ऑपरेशन सेल कडुन पोलीस आयुक्तालय हद्दीतील न्हावाशेवा पोर्ट, नवी मुंबई येथे दुबई येथून कंटेनर मध्ये अंमली पदार्थ दडवून दि. १५/१२/२०२१ रोजी भारतात आणल्याची व सदरच्या कंटेनर मधील माल घेण्यासाठी अद्यापही कोणी आले नसल्याची माहीती पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा यांना मिळाली होती.
.प्राप्त झालेल्या माहितीची पोलीस आयुक्त, बिपीनकुमार सिंह यांनी गंभीर दखल घेवुन पोलीस उप आयुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, नवी मुंबईच्या पोलीस पथकाने सदर कंटेनरचा शोध घेतला असता सदरचा कंटेनर हा दुबई येथुन न्हावाशेवा पोर्ट येथे आयात केला असल्याचे व सदर कंटेनर नवकार लॉजीस्टीक, सर्वे नं. १३७/१९/१, नवीन आजिवली गाव, जुना मुंबई पुणे महामार्ग पनवेल येथे उतरविण्यात आल्याची गोपनीय माहिती अत्यंत वेगाने मिळाली होती.
सदर कंटेनर मधील आयात केलेल्या मार्बल्स घेवून जाण्यास कोणीही दावा न केल्याने सदर कंटेनरचा संशय आल्याने कंटेनरची पंचासमक्ष पाहणी करण्यात आली असता त्यामधील मार्बल्स पुर्णपणे कंटेनरच्या बाहेर काढल्यानंतर कंटनरचे दरवाजाला असलेल्या फ्रेमची बारकाईने पाहणी केली असता फ्रेममध्ये कोणतातरी अंमलीपदार्थ लपविला असल्याचा संशय बळावल्याने कंटेनरचा दरवाजा व त्यावरील फेम कटर मशिनच्या सहाय्याने कापण्यात आले असता त्यामध्ये हेरॉईन नामक अंमलीपदार्थ असलेले ७२.५१८ कि.ग्रॅ. वजनाचे व सुमारे ३६२.५९ कोटी रुपये किंमतीचे प्लॅस्टीक कागदाच्या वेष्टनामध्ये पॅक केलेले एकुण १६८ पॅकेट्स मिळुन आले.
याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापरावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २२ (क), २३ (क), २९ कलमान्वये सदरचा (अंमली पदार्थ (हेरॉईन) संगनमत करून अवैधरित्या भारतात आयात करणारे निर्यात करणारे, शिपर्स व आयात व निर्यात दरम्यान प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्या इसांमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील तपास गुन्हे शाखा, (विशेष तपास पथक ) करत आहेत.
सदरची कामगीरी ही बिपीनकुमार सिंह, पोलीस आयुक्त, नवी मुंबई व कुलवंतकुमार सरंगल अपर पोलीस महासंचालक (का.व.सु) डॉ. जय जाधव, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली महेश घुर्ये, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), सुरेश मेंगडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शैलेश पासलवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त, एएचटीयु गुन्हे शाखा, नवी मुंबई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासीर अली सय्यद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सपोनि संदिप गायकवाड, सपोनि विजय चव्हाण, सपोनि श्रीमती राणी काळे, पो.उप.नि. विजय शिंगे व गुन्हे शाखा नवी मुंबईचे अंमलदार तसेच रविंद्र दौंडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंकुश खेडकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि तुकाराम कोरडे, सपोनि अविनाश पाळदे, सपोनि श्रीमती धनश्री पवार, पनवेल तालुका पोलीस ठाणे, नवी मुंबई व कोमलप्रीत सिंह पोलीस उप निरीक्षक, एस. एस. ओ. सी. मोहाली, पंजाब यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.
Tags
क्राईम न्यूज