ठकसेन शिवानंद कुंभारची कर्नाटक, महाराष्ट्रात मालमत्ता
त्याच्या नावाने असलेली बँक खाती गोठवण्यात आली असून पोलिसांनी त्याच्याकडून रोख वीस लाख रुपये जप्त केले आहेत.
प्रेस मीडिया लाईव्ह :
बेळगाव, ता. २-बेळगांव पोलिसांकडून २० लाखाची रोकड जप्त सिमेंट आणि लोखंडाच्या व्यापारात गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळेल असे आमिष दाखवून अनेका कडून लाखो रुपये उकळलेल्या इचलकरंजीच्या ठकसेनाला बेळगाव पोलिसांनी मुंबईतून अटक केली. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
शिवानंद दादू कुंभार (४६, रा. यड्राव ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. बेळगावातील एका व्यक्तीच्या मार्फत शिवानंद कुंभार याने सिमेंट आणि लोखंडाच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखवून पंचाहत्तर लाखाहून अधिक रक्कम शिवानंद याने उचलली होती. फसवणुकीच्या बाबत सी ई एन पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात होती. काही जणांना सुरुवातीला त्याने पैसेही दिले पण मोठी रक्कम गोळा झाल्या नंतर त्याने आपल्या कुटुंबासह देश सोडला होता पत्नी, मुलासह शिवानंद याने मालदीव, इजिप्त आणि दुबई फिरून शेवटी नेपाळ मध्ये मुक्काम ठोकला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच भारतीय दूतावास आणि इंटरपोल यांच्या मदतीने नेपाळ पोलिसांशी संपर्क साधला होता. त्याचवेळी शिवानंद कुंभार.
हा मुंबईला येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना झाले आणि त्याला२६ जून रोजी ताब्यात घेतले. बेळगावला आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याने सिमेंट आणि लोखंड व्यवसायात गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम मिळेल असे आमिष दाखवून अनेक जणाकडून पैसे उकळल्याचे कबूल केले.लोकांच्या कडून उकळलेल्या पैशातून महाराष्ट्र आणि कर्नाटकात शिवानंद याने मालमत्ता देखील खरेदी केल्याचे उघड झाले आहे. त्याच्या नावाने असलेली बँक खाती गोठवण्यात आली असून पोलिसांनी त्याच्याकडून रोख वीस लाख रुपये जप्त केले आहेत.