१८२ कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.
वारणानगर : तात्यासाहेब कोरेनगर येथील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा ५४ वा वर्धापनदिन बुधवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संघामार्फत आयोजित शिबिरामध्ये १८२ कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.
वारणा दूध संघाच्या मुख्य दुग्धालयात सकाळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा झाली.रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपाध्यक्ष जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. वर्धापनदिनाचे औचित्य साधून वारणा दूध संघाच्या वर्धापनदिनानिमित्त शिबिरातील रक्तदात्यांचा सत्कार करताना बुधाले, संकलन व्यवस्थापक डॉ. उपाध्यक्ष एच. आर. जाधव, मोहन येडूरकर यांच्यासह अन्य. अशोक पाटील, सिव्हील ऑफिसर शरद शेटे, अनिल लंबे, कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, डॉ. प्रकाश गाडवे, डॉ. जीवन सगरे, प्रमोद मंगसुळे उपस्थित होते. तात्यासाहेब कोरे ब्लड बँक पारगाव व अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांनी रक्त संकलित केले. संघाचे शेती विभागाकडील नव्यानेखरेदी केलेल्या सायलेज बेलिंग मशीनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. दूध उत्पादक शेतकरी, कर्मचाऱ्यांचे पाठबळ आणि संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरेयांच्या मार्गदर्शनाखाली संघाची देदीप्यमान प्रगती सुरू आहे, असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी संचालक अभिजित पाटील, शिवाजी कापरे, अॅड. एन. आर. पाटील, शिवाजी जंगम, माधव गुळवणी, प्रदीप देशमुख, राजवर्धन मोहिते, शिवाजी मोरे, महेंद्र शिंदे ,लालासो पाटील, चंद्रशेखर बुवा, व्ही. टी. पाटील, के. आर. पाटील, डॉ. मिलिंद हिरवे, मयूर पाटील, शोभा पाटील, शमशाद मुल्ला, अकौंटस् मॅनेजर सुधीर कामेरीकर, मार्केटिंग अनिल हेरले फॅक्टरी इनचार्ज श्रीधर बुधाले,
संकलन व्यवस्थापक डॉ.अशोक पाटील , सिव्हिल ऑफिसर शरद शेटे , अनिल लंबे, कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव , डॉ. प्रकाश गाढवे, डॉ. जीवन सगरे, प्रमोद मंगसुळे उपस्थित होते. तात्यासाहेब कोरे ब्लड बँक कोल्हापूर यांनी रक्त संकलित केले
Tags
आपला जिल्हा