व्यावसायिकांनी प्लास्टिक मुक्तीसाठी मदत करण्याचे प्रशासनाचे आवाहन


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असून प्रशासनही कायद्याचे पालन करत आहे. कायदा मोडण्यात धन्यता न मानता इचलकंजी शहर होल्डिंग मुक्त केले तसे व्यावसायिकांनी स्वतःहून प्लास्टिक मुक्तीसाठी मदत करावी, असे आवाहन इचलकरंजी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी व्यावसायिकांच्या बैठकीत बोलताना केले. 

इचलकरंजी नगरपालिका शासन आदेशानुसार प्लास्टिक विरोधात घडक कारवाई करत आहे. या पार्श्वभूमीवर किरकोळ किराणा, भुसारी व्यापारी असोसिएशनच्यावतीनं बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यावसायिकांच्या वतीने आपली बाजू मांडताना अशोक पाटणी, महावीर शिरगुप्पे, अभिजीत पटवा यांनी शहर प्लास्टिक मुक्त करण्यास व्यावसायिकांचा विरोध नाही ,पण बहुतांश वस्तूंचे पॅकींग कंपनी करते. त्यामुळे कायदा आणि परिस्थिती पाहून व्यावसायिकांवर कारवाई करावी. तसेच प्लास्टिकला पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

सुभाष मालपाणी यांनी प्लॅस्टिकमुळे प्रदूषण वाढत असल्याने शासनाने कठोर पावले उचलली आहेत. ही बंदी अंगवळणी पडण्यास थोडा वेळ लागेल.मात्र ती गरजेची असल्याचे सांगितले. आरोग्य अधिकारी डॉ.

संगेवार यांनी शहरात वन टाईम युज प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात बाढत आहे. हा कचरा नष्ट आणि पुर्नवापर होत नसल्याने प्रदुषणात भरच पडत आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे महापुराचाही प्रश्न निर्माण होत असल्याने ७५ मायक्रोनहून कमी जाडीचे प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदीला समर्थन देत पर्यावरणास हानी पोहचेल असे कोणतेही कृत्य न करण्याची शपथही घेतली. या बैठकीस शहर परिसरातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post