ग्रामपंचायत कडून विधवा महिलांना पुनर्विवाहसाठी रूपये दहा हजार ची मदत जाहीर..
प्रेस मीडिया लाईव्ह :
टाकळीवाडी / रमेशकुमार मिठारे :
महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका मधील टाकळीवाडी या गावात नव्याने निर्मळे समाजाची ताईबाई मंदिर बांधण्यात आली आहे.यावेळी रोहीदास समाजातील सरिता निर्मळे,शोभा निर्मळे, चंद्राबाई निर्मळे, रेश्मा निर्मळे, संगिता निर्मळे या विधवा महिलांना सुहासिनीचा मान देऊन त्यांच्या हस्ते देवीची पुजा अर्चा करून मंदिराचे वास्तुशांतीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी रोहीदास समाजाचे सेवानिवृत्त कॅप्टन रमेश निर्मळे यांनी म्हणाले की समाजात विधवा महिलांचा सर्वस्तरावर मान-सन्मान व्हावा व रुढी परंपरांमुळे विधवा महिलांना जो मानसीक त्रास सहन करावा लागतो तो होऊ नये सर्व सामान्य महिलांच्या बरोबर त्यांनासुद्धा सहभाग होता आला पाहिजे यासाठी आमच्या समाजानी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायत सदस्य तुकाराम चिगरे यांनी रोहीदास समाजाचे कौतुक करून टाकळीवाडी ग्रामपंचायत वतीने विधवा महिलांना पुनर्विवाहसाठी रूपये दहा हजार ची मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी उपसरपंच बाजीराव गोरे यांची प्रमुख उपस्थितीत होती.या कार्यक्रमास मंगराया हाके,सर्व ग्रामपंचायत सदस्य, रोहीदास समाजाचे आप्पासो निर्मळे,भरत निर्मळे,मोहन निर्मळे,मल्लाप्पा निर्मळे, नामदेव निर्मळे, मच्छिंद्र निर्मळे , समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.